भोयगाव ते परसोडा कोस्टल मार्ग तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:21 AM2021-05-29T04:21:54+5:302021-05-29T04:21:54+5:30
कोरपना: वर्धा-पैनगंगा नदी किनाऱ्यावरील भोयगाव ते परसोडापर्यंत नदी किनारी रस्ता (कोस्टल मार्ग) तयार करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत ...
कोरपना: वर्धा-पैनगंगा नदी किनाऱ्यावरील भोयगाव ते परसोडापर्यंत नदी किनारी रस्ता (कोस्टल मार्ग) तयार करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तालुक्यातील उत्तर टोकावरील भोयगावपासून पश्चिम टोकावरील परसोडाचे सद्यस्थितीत अंतर ५० किलोमीटर आहे. या मार्गाची निर्मिती झाल्यास हे अंतर १५ ते २० किलोमीटर अंतराने कमी होईल, शिवाय थेट प्रवासासाठी मार्ग उपलब्ध होऊन परिसरातील उद्योग, शेती, दळणवळणासाठी सोयीचा होईल. भोयगाव, भारोसा, एकोडी, इरई, विरुर, कारवाई, सांगोडा, अंतरगाव, वनोजा, झोटिंग, नारंडा, पिपरी, कोडशी खु., कोडशी बु., गांधीनगर, तुळशी, जेवरा, अकोला, पारडी, मेहंदी, कोठोडा, गोविंदपूर, रायपूर, परसोडा या २४ गावांतून तेलंगणा राज्य सीमेला जोडणारा वेगवान मार्ग उपलब्ध होईल. या माध्यमातून परसोडा परिसरातील नागरिकांना जिल्हा मुख्यालय चंद्रपूर गाठणे कमी अंतरात सोयीचे होऊ शकते. या अनुषंगाने प्रारूप आराखडा तयार करून सदर रस्त्याला गती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.