पर्यावरणयुक्त भवन उभे करा

By Admin | Published: July 16, 2016 01:07 AM2016-07-16T01:07:15+5:302016-07-16T01:19:06+5:30

विकासाच्या कामात जात, धर्म, पक्ष सोडून एकत्र यावे लागते. शहर पुढे न्यायचे असेल तर नेत्यांनी नाही,

Build Environmental Building | पर्यावरणयुक्त भवन उभे करा

पर्यावरणयुक्त भवन उभे करा

googlenewsNext

औरंगाबाद : आषाढी एकादशीनिमित्त लोकमतच्या वतीने अमरप्रीत चौकात ‘पंढरीची वारी आणि विठ्ठलाचा देखावा’ तयार करण्यात आला होता. विठ्ठलाच्या मूर्तीसमोर भाविक नतमस्तक झाले.
देवासमोर सुरेख रांगोळी काढण्यात आली होती. त्यात ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ हे शब्द साकारण्यात आले. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या १० फूट उंच मूर्तीसमोर हजारो भाविक व वारकरी नतमस्तक होत होते. जालना रोडवरून छोट्या पंढरपूरकडे जाणाऱ्या प्रत्येक दिंडीतील वारकरी येथे आवर्जून थांबत व विठ्ठलाचे दर्शन घेत होते. विठ्ठलाच्या देखाव्यासमोर तरुण-तरुणी आपले ‘सेल्फी’ही काढत होते. देखावा पाहून पंढरपूरचे दृश्य डोळ्यासमोर उभे राहिले, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. हा देखावा मुकुंद गोलटगावकर यांनी तयार केला होता. याच ठिकाणी बाजूला कमलनयन बजाज हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य तपासणीही केली जात होती. दिंडीत पायी चालणाऱ्या शेकडो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी डॉ.योगेश कुणदे, डॉ.वैशाली कुलकर्णी यांनी केली. त्यांना राधा, श्रीसुंदर व उमेश धावणे यांनी सहकार्य केले. आषाढी एकादशीनिमित्त पहिल्यांदाच लोकमतच्या वतीने असा उपक्रम घेण्यात आला. त्यास वारकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या उपक्रमासाठी आ.सुभाष झांबड यांनी जागा उपलब्ध करून दिली. तसेच बँक आॅफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक नीलेश मोरे तसेच संदेश झांबड, संजय लाईटचे संजय घाटे, किरण पाटील, महेश दुरवट पाटील यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Build Environmental Building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.