पाणी व वीजपुरवठ्यासह जलदगतीने बांधकाम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:31 AM2021-08-28T04:31:44+5:302021-08-28T04:31:44+5:30

विभागीय आयुक्तांनी घेतला वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाचा आढावा चंद्रपूर: येथील निर्माणाधीन असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामाचा नागपूर विभागीय ...

Build fast with water and electricity supply | पाणी व वीजपुरवठ्यासह जलदगतीने बांधकाम करा

पाणी व वीजपुरवठ्यासह जलदगतीने बांधकाम करा

Next

विभागीय आयुक्तांनी घेतला वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाचा आढावा

चंद्रपूर: येथील निर्माणाधीन असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामाचा नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. प्रस्तावित बांधकामात पाणीपुरवठा व विद्युत पुरवठ्याचे योग्य नियोजन करून जलदगतीने बांधकाम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मनपा आयुक्त राजेश मोहिते, सा.बां. विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, ‘महावितरण’च्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. अविनाश टेकाडे, प्रकल्पाचे बांधकाम महाव्यवस्थापक चंदनकुमार, उपमहाव्यवस्थापक अमितेश खोत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता के. आर. घोडमारे आदी उपस्थित होते.

वैद्यकीय रुग्णालयाचे बांधकाम कधीपर्यंत पूर्ण होणार आहे, असे विचारून विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे म्हणाल्या, संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये बांधकामावर परिणाम होऊ देऊ नका. अशा परिस्थितीतही कामगार उपलब्ध असले पाहिजे. त्यासाठी त्यांचे बांधकाम साईटवर लसीकरण, त्यांच्या राहण्याची व्यवस्था आदींचे नियोजन करावे. निर्माणाधीन इमारतीचे बांधकाम होत असलेल्या परिसरात पाण्याचा स्रोत बघा. या भागात भूजल सर्वेक्षण विभागाकडून पाण्यासंदर्भात काही निरीक्षणे असतील तर त्या तपासा. वैद्यकीय महाविद्यालयाला प्रतिदिन नऊलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता राहणार आहे. त्याची पूर्तता होण्यासाठी योग्य पाण्याचा स्रोत त्वरित शोधा. तसेच याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करा. विद्युत पुरवठ्याचे कामही जलदगतीने करा. तसेच बांधकामाच्या प्रगतीचा अहवाल नियमितपणे जिल्हाधिका-यांकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे, अशा सूचना त्यांनी केल्या.

बाॅक्स

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम हे शंभर एकरावर होत असून या प्रकल्पाला १९ मे २०१९ रोजी सुरूवात झाली. एकूण ५९८ कोटींचे हे बांधकाम आहे. यापैकी २३० कोटी रुपये प्राप्त झाले असून एकूण बांधकामाच्या ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे तसेच मुख्य रुग्णालयाच्या इमारतीचे २५ टक्के बांधकाम पूर्ण, निवासी वसाहत टाईप-२ आणि ३ चे ८८ टक्के बांधकाम, वसतिगृहाचे ७९ टक्के बांधकाम, मुलींच्या वसतिगृहाचे ६९ टक्के बांधकाम, निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाचे ६८ टक्के, लायब्ररी व प्रशासकीय इमारतीचे ६१ टक्के, वैद्यकीय प्रयोगशाळेचे ४८ टक्के बांधकाम, इतर कार्यालयांचे ५८ टक्के बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

Web Title: Build fast with water and electricity supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.