सराय इमारतीमध्ये संग्रहालय उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:06 AM2018-04-20T00:06:21+5:302018-04-20T00:06:21+5:30
शहरातील ब्रिटिशकालीन नगरपालिकेची धर्मशाळा म्हणजे सराय इमारतीची इको- प्रो संस्थेच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता केली. या इमारतीची नोंदणी पुरातत्त्व विभागाकडे नसली तरी शहराच्या ऐतिहासिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील ब्रिटिशकालीन नगरपालिकेची धर्मशाळा म्हणजे सराय इमारतीची इको- प्रो संस्थेच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता केली. या इमारतीची नोंदणी पुरातत्त्व विभागाकडे नसली तरी शहराच्या ऐतिहासिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. मोडकळीस आलेल्या सराय इमारतीचे संवर्धन करून शहर पर्यटन माहिती केंद्र किंवा संग्रहालय तयार करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
शहरातील ऐतिहासिक वारशाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी इको- प्रोने १ मार्च २०१७ पासून चंद्र्रपूर किल्ला-परकोट स्वच्छता अभियान सुरू केले. सुमारे अकरा किमी लांब किल्लाची भिंत स्वच्छ करण्याचे कार्य नियमितपणे सुरू आहे. या अभियानाला चारशे दिवस पूर्ण झाले आहेत. नागरिक, प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य मिळत आहे. स्वच्छ आणि सुंदर चंद्रपूर करण्यासाठी शहरातील ऐतिहासिक स्मारकांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
जटपुरा गेटच्या बाहेर तत्कालीन नगरपालिकेने बांधलेली धर्मशाळा म्हणजे सराय आजही उभी आहे. सदर इमारतब्रिटीशकाळात बांधण्यात आल. सरायच्या बांधकामाचे भूमीपुजन २ आॅक्टोबर १९२१ ला करण्यात आले होते. सरायमध्ये स्वातंत्र्यपूर्र्व काळात चळवळीतील अनेक नेते मुक्कामी राहिली होती. शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. ही इमारत शहराच्या इतिहासावर व्यापक प्रकाश टाकते.
मात्र सरायची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. दरवाजे, खिडक्या चोरीला गेल्या. काही वर्षांपूर्वी नगरपालिकेतील विभागाचे कामकाज चालायचे. तेही बंद झाल्याने इमारतीची दुरवस्था झाली आहे. ऐतिहासिक वास्तुचे संवर्धन करावी, जिल्हा प्रशासन तसेच मनपाने यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी इको-प्रोच्या वतीने निवेदनातून करण्यात आली. सराय स्वच्छता मोहिमेत इको-प्रोचे बंडु धोतरे, रवींद्र गुरनुले, नितीन रामटेके, धमेंद्र लुनावत, संजय सब्बनवार, बिमल शहा, राजु काहीलकर, हरीश मेश्राम, अमोल उट्टलवार, वैभव मडावी, रोशन धोतरे, अतुल रांखुडे, आकाश घोडमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. हा उपक्रम नियमित सुरू ठेवण्याचा संकल्पही संस्थेने जाहीर केला आहे.