चिमूर, पोंभूर्णा, बल्लारपूर, मूलच्या क्रीडा संकुुलाचे बांधकाम जलद गतीने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 10:54 PM2018-07-11T22:54:17+5:302018-07-11T22:54:49+5:30

मिशन शौर्य अंतर्गत जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट शिखर सर करून जिल्ह्याची मान अभिमानाने उंच केली आहे. मिशन शौर्यच्या यशानंतर आता मिशन शक्ती ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत आॅलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी खेळाडू तयार करण्यात येणार आहे. या दृष्टीने चिमूर, पोंभूर्णा, मूल आणि बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकुलांचे बांधकाम नोव्हेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

Build speedy construction of Chimur, Ponbhaura, Ballarpur, basic sports complex | चिमूर, पोंभूर्णा, बल्लारपूर, मूलच्या क्रीडा संकुुलाचे बांधकाम जलद गतीने करा

चिमूर, पोंभूर्णा, बल्लारपूर, मूलच्या क्रीडा संकुुलाचे बांधकाम जलद गतीने करा

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश : ‘मिशन शक्ती’अंतर्गत आॅलिम्पिक स्पर्धेतही यश मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मिशन शौर्य अंतर्गत जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट शिखर सर करून जिल्ह्याची मान अभिमानाने उंच केली आहे. मिशन शौर्यच्या यशानंतर आता मिशन शक्ती ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत आॅलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी खेळाडू तयार करण्यात येणार आहे. या दृष्टीने चिमूर, पोंभूर्णा, मूल आणि बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकुलांचे बांधकाम नोव्हेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
वनसभागृह, नागपूर येथे मंगळवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी चिमूर, पोंभूर्णा, मूल आणि बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकुलांच्या बांधकामांचा आढावा घेतला. तालुका क्रीडा संकुलांच्या माध्यमातून खेळाडूंना अद्यावत क्रीडा सुविधा उपलब्ध करून देत प्रशिक्षण देवून आॅलिम्पिक क्रीडा स्पर्धेकरिता तयारी करून घेता येईल, या दृष्टीने क्रीडा संकुलांचे बांधकाम जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी व खेळाडूंकडून सरावाच्या माध्यमातून सन २०२४ च्या आॅलिम्पिकमध्ये सहभागी होऊन नेत्रदीपक कामगिरी करण्याच्या दृष्टीने, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यापूर्वी प्राविण्यप्राप्त खेळाडू तयार केलेल्या क्रीडा मार्गदर्शकांची सेवा उपलब्ध करून देता येईल. या व्यतिरिक्त वेळोवेळी संबंधित खेळांचे आंतरराष्ट्रीय खेळाडू व तज्ञ्ज यांना आमंत्रित करून त्यांच्या अनुभवाचा लाभ मिळवून देता येईल.
याचप्रमाणे नॅशनल इन्स्टिट्युट आॅफ स्पोर्ट्स या संस्थेमधून क्रीडा प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या क्रीडा मार्गदर्शकांची देखील सेवा घेता येईल, असेही यावेळी ते म्हणाले.
यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, क्रीडा व युवक सेवा विभागाचे नागपूर विभागीय उपसंचालक, जिल्हा क्रीडा अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यासह जिल्ह्यातील अन्य अधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन
२५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बल्लारपूर येथील क्रीडा संकुलाचे उद्घाटन करण्याचे नियोजित आहे. त्या दृष्टीने सदर क्रीडा संकुलांचे बांधकाम जलद गतीने पूर्ण करावे, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना सांगितले.

Web Title: Build speedy construction of Chimur, Ponbhaura, Ballarpur, basic sports complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.