बांधकाम व्यावसायिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:27 AM2021-05-15T04:27:07+5:302021-05-15T04:27:07+5:30

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे बांधकाम व्यावसायिक पुन्हा अडचणीत आले आहेत. बांधलेले फ्लॅट विकले जाणार की नाही, अशी त्यांना भीती ...

Builders in trouble | बांधकाम व्यावसायिक अडचणीत

बांधकाम व्यावसायिक अडचणीत

Next

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे बांधकाम व्यावसायिक पुन्हा अडचणीत आले आहेत. बांधलेले फ्लॅट विकले जाणार की नाही, अशी त्यांना भीती सतावत आहे. त्यामुळे शासनाने धोरण जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे .

पाणपोईमुळे नागरिकांना दिलासा

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून तापमान वाढत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावरील नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. ही समस्या लक्षात घेता विठाई संस्थेच्या वतीने येथील जटपुरा गेट परिसरात पाणपोई सुरु करण्यात आली. यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

शहराचे विद्रुपीकरण सुरूच

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे नागरिक अडचणीत सापडले आहेत. असे असले तरी काही नागरिक शहरातील चौकाचौकात मोठमोठे बॅनर लावून स्वत:ची जाहिरात करून घेत आहेत. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच महापौरांनी बैठक घेत याकडे लक्ष वेधले होते. मात्र, त्यानंतरही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.

भंगार वाहनांचा लिलाव करावा

चंद्रपूर : शासकीय कार्यालय तसेच रामनगर, सिटी पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात भंगार वाहने ठेवण्यात आली आहेत. या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात जागा व्यापली असून, येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सदर वाहनांचा लिलाव करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

रोजगार देण्याची मागणी

चंद्रपूर: लॉकडाऊनंतर अनेकांनी पुन्हा आपल्या गावचा रस्ता धरला आहे. मात्र, आता हाताला काम नसल्याने त्यांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे गावागावात रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे .

पावसाळ्यापूर्वी फांद्या तोडाव्यात

चंद्रपूर : शहरातील विविध वार्डातील रस्त्यावर असलेल्या झाडांच्या फांद्या वाढल्या आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. पावसाळ्यापूर्वी या फांद्या तोडून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

चालकांना हवी मदत

चंद्रपूर : शहरामध्ये मोठ्या संख्येने ऑटो चालक आहेत. मात्र, प्रत्येकाची नोंदणी न झाल्यामुळे त्यांना शासकीय लाभापासून वंचित राहावे लागत आहे. या चालकांनाही शासनाने मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

रस्त्यावर वाहनधारकांचे अतिक्रमण

चंद्रपूर : वरोरा नाका चौक ते कुंदन प्लाझा चौकापर्यंत काही व्यावसायिक नवे वाहन ठेवत आहेत. त्यामुळे अन्य वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, सध्या लाॅकडाऊन असल्यामुळे सर्वत्र व्यवहार बंद आहेत, अशा वेळीही वाहने रस्त्यावर आहेत. त्यामुळे सदर वाहने हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.

रस्त्यावर भाजीपाला विक्री सुरू

चंद्रपूर : वडगाव, पडोली परिसरातील काही व्यावसायिक रस्त्यावर बसून भाजीपाला विक्री करीत आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांना बसण्यासाठी ओटे तयार करून देण्याची मागणी केली जात आहे.

कचरा नियमित उचलावा

चंद्रपूर : येथील वडगाव, समाधी वार्ड, बिनबा वार्ड आदी परिसरात कचऱ्याचे ढीग असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा नियमित उचलण्याची मागणी करण्यात आली आहे.

वार्डनिहाय लसीकरण केंद्र द्यावे

चंद्रपूर : कोरोना संकट वाढत आहे. त्यावर प्रभावी उपाय म्हणून लस घेणे होय. परंतु, लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी राहाते. त्यामुळे नागरिकांना लसीकरणासाठी रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे प्रत्येक वार्डात लसीकरण केंद्र निर्माण करावे, अशी मागणी होत आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यास मदत होणार आहे. आता १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार असल्याने गर्दी वाढणार आहे. त्यामुळे केंद्र वाढवणे गरजेचे आहे.

लाभार्थ्यांना योजनेचा लाभ द्या

चंद्रपूर : श्रावणबाळ योजना, राजीव गांधी निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना अशा योजनेंतर्गत वृद्धांना मानधन देण्यात येते. मात्र, या योजनेचा लाभ घेताना वृद्धांना खूप अडचणी जाणवतात. पैसे जमा होण्याची निश्चित तारीख माहीत नसल्यामुळे बँकेभोवती चकरा माराव्या लागतात. तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागते. यामुळे शासनाने यात नियमितता ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.

धोकादायक पुलाला कठडे लावा

चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक नाल्यांवर पुलांचे बांधकाम झाले आहे. मात्र, पुलाला संरक्षक कठडे नसल्याने अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे या पुलांवर कठडे लावण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील नाल्यांवरील संरक्षक कठडे तुटले असून, काही चोरीलाही गेले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन नव्याने कठडे बांधावेत, अशी मागणी होत आहे.

शासकीय कार्यालयांची स्वच्छता करावी

चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश शासकीय कार्यालयात अस्वच्छता आहे. विशेषत: प्रशासकीय भवन परिसर सोडले तर इतर कार्यालयांमध्ये अस्वच्छता बघायला मिळते. भिंतीवर व पायऱ्यांवर तंबाखू व गुटखा खाऊन थुंकल्याचे दिसून येते. या प्रक्रियेत जनतेसोबतच कार्यालयीन कर्मचाऱ्यांचाही सहभाग असतो. त्यामुळे दंडात्मक कारवाई करण्याची मागणी आहे.

कर्मचारी थकबाकी मिळण्याच्या प्रतीक्षेत

चंद्रपूर : मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याची मागणी केली आहे. मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना सहावा वेतन आयोग पाच वर्षे उशिराने लागू करण्यात आला. दरम्यान, या कालखंडातील थकबाकी कामगारांना अद्याप देण्यात आली नाही.

Web Title: Builders in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.