खाणीतील कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:01 PM2018-03-20T23:01:33+5:302018-03-20T23:01:33+5:30

वेकोलिने देशाच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले असून आजही आघाडीवर आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार खाणीतील कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी केली जात आहे, असे प्रतिपादन इंडियन ब्युरो आॅफ माईन्स, प्रादेशिक कार्यालयाचे नियंत्रक अरूण प्रसाद यांनी केले.

Building the capacity of mine workers | खाणीतील कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी

खाणीतील कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी

Next
ठळक मुद्देअरुण प्रसाद : भारतीय खाण मानक संस्थेतर्फे कार्यशाळा

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : वेकोलिने देशाच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले असून आजही आघाडीवर आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार खाणीतील कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी केली जात आहे, असे प्रतिपादन इंडियन ब्युरो आॅफ माईन्स, प्रादेशिक कार्यालयाचे नियंत्रक अरूण प्रसाद यांनी केले. स्थानिक एका हॉटेलात पार पडलेल्या ‘स्वच्छता ते सतत विकास’ या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी केवल कृष्णन, गजानंद कामडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेत कचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि हाऊस किंपिंगच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि उत्तम पद्धती याविषयी पॉवर पार्इंटद्वारे माहिती देण्यात आली.
अरुण प्रसाद म्हणाले, भारतीय खान विभागाने बदलत्या काळासोबत चालण्याचे धोरण तयार केले. त्यानुसार वाटचाल सुरू आहे. अधिकारी व कर्मचाºयांनी नवा विचार आत्मसात केला पाहिजे. सामाजिकदृष्ट्या जबाबदार आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य वातावरणाची सुनिश्चिती करण्यासाठी खाण क्षेत्रातील शाश्वततेवर भर दिला जात आहे. परस्परांशी संवाद साधून कृती करून स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करावे, असेही त्यांनी नमूद केले. केवल कृष्णन यांनी स्वागतपर भाषण केले. एसबीएम नागपूर प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने सुरू केलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. शिबिरादरम्यान आयबीएम अधिकाºयांनी चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा आणि नागपूर या पाच जिल्ह्यातील १३ गावांना भेट दिली. आयबीएमचे मुख्यालय नागपुरात आहे. अधिकारी व कर्मचाºयांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमांचा लाभ होतो. प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन यापुढे सुरूच राहणार असून त्यातून कौशल्याचा विकास केला जाणार आहे. उत्पादन आणि नव्या स्पर्धेसाठी सज्जता हा मुद्दा प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयांनी स्वीकारावा. या हेतूने खाण क्षेत्रातील समव्यावसायिकांपर्यत संदेश पोहोचविण्यात आला. याप्रसंगी गजानन कामडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यशाळेचे उद्दिष्ट
उद्योगातील शाश्वत खाणकाम समजून घेणे.
एसबीएमच्या समस्या आणि मर्यादांचे मात करणे.
विविध दृष्टिकोन, पद्धती आणि परिणाम जाणून घेणे.
संबंधित खाणींमध्ये समस्या सोडवणुकीसाठी नियोजनानुसार अंमलबजावणी.
खाण कर्मचाºयांची क्षमता बांधणी आणि स्वच्छ भारत अभियानाच्या नियोजनाची अंमलबजावणी.

Web Title: Building the capacity of mine workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.