खाटांसाठी इमारती व हॉटेल ताब्यात घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:27 AM2021-04-17T04:27:42+5:302021-04-17T04:27:42+5:30

कोरोनाच्या उद्रेकामुळे काही दिवसांतच अडचणींचा सामना करावा लागणार आहे. हे लक्षात येताच पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने ...

Buildings and hotels for beds will be taken over | खाटांसाठी इमारती व हॉटेल ताब्यात घेणार

खाटांसाठी इमारती व हॉटेल ताब्यात घेणार

Next

कोरोनाच्या उद्रेकामुळे काही दिवसांतच अडचणींचा सामना करावा लागणार आहे. हे लक्षात येताच पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना खाटा वाढविण्याचा दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार कार्यवाहीला सुरुवात झाली. येत्या आठ दिवसांत १२७० खाटा उपलब्ध करण्यासाठी प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.

महिला रुग्णालयात १०० पैकी २५ खाटा उपलब्ध

१२७० खाटांपैकी निम्म्यापेक्षा अधिक खाटा तर येत्या चार ते पाच दिवसांत उपलब्ध होतील, अशी तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. चंद्रपूर येथील महिला रुग्णालयात १०० पैकी २५ खाटा सुरू झाल्या आहेत. उर्वरित ७५ खाटा तत्काळ सुरू होतील. शिवाय, खाटांसाठी इमारती व हॉटेल ताब्यात येणार आहेत.

असे आहे केंद्रनिहाय खाटांचे नियोजन

केंद्रीय सैनिक शाळा ४००

सन्मित्र सैनिक शाळा १५०

महाकाली पॉलिटेक्निक वरोरा २००

आदिवासी वसतिगृह भद्रावती ४०

आदिवासी वसतिगृह सिंदेवाही १००

ब्रह्मपुरी ९५

आयटीआय वसतिगृह नागभीड ५०

नगर परिषद मॉडेल स्कूल मूल १००

सावली ४५

राजुरा ३०

Web Title: Buildings and hotels for beds will be taken over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.