खड्ड्यात पडलेल्या बैलाला सुखरूप काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 12:19 AM2019-07-08T00:19:25+5:302019-07-08T00:20:11+5:30

तुकुम विद्याविहार स्कूलजवळील नवीन बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या खोल टाकित पडलेल्या एका बैलाचे रेस्क्यू आॅपरेशन करून इको-प्रोच्या नगर संरक्षक दलाने नागरिकांच्या मदतीने सुखरुप बाहेर काढले.

The bull that was left in the pit safely removed | खड्ड्यात पडलेल्या बैलाला सुखरूप काढले

खड्ड्यात पडलेल्या बैलाला सुखरूप काढले

Next
ठळक मुद्देइको प्रो संरक्षक दल : स्थानिक नागरिकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपुर: तुकुम विद्याविहार स्कूलजवळील नवीन बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या खोल टाकित पडलेल्या एका बैलाचे रेस्क्यू आॅपरेशन करून इको-प्रोच्या नगर संरक्षक दलाने नागरिकांच्या मदतीने सुखरुप बाहेर काढले.
शुक्रवारी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास विद्याविहार स्कूल जवळील एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. येथे शौलायाच्या टाकीसाठी खड्डा तयार करण्यात आला. या खड्ड्यात रात्रीच्या सुमारास बैल पडला. नागरिकांनी या बैलाला काढण्यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर इको-प्रोला माहिती देण्यात आली. सदस्यांनी घटनास्थळी जाऊन बघितले. शनिवारी सकाळी आठ वाजता सदर बैलास बाहेर काढण्याकरिता आपरेशन सुरु करण्यात आले. इको-प्रोचे बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात वन्यजीव रेस्क्यू दलचे सदस्य, नगर संरक्षक दलचे सदस्य, स्थानिक नगरसेवक वायकर, महानगरपालिका स्वच्छता कर्मचारी, स्थानिक नागरिकांच्या मदतीने बैलाला सुखरुप बाहेर काढण्यात आले. अभियानात बंडू धोतरे यांच्यासह अनिल अदगुरवार, बीमल शहा, सचिन धोतरे, अमोल उत्तलवार, कपिल चौधरी, प्रमोद मालिक, स्वप्नील रागीट, नगरसेवक वायकर, किरण निब्रड, मनपा कर्मचारी नीलेश कोतपल्लीवार, भगत, प्रकाश जुमडे, खोब्रागडे आदींची उपस्थिती होती.

नागरिकांचा रोष
सदर इमारतीच्या टाकीकडील बाजूला संरक्षण भिंत बांण्याची मागणी करण्यात आली. लहान मुले, वृद्ध व्यक्ति, ये-जा करणाऱ्या छोट्या वाहनांकरिता धोकादायक असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला.

Web Title: The bull that was left in the pit safely removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.