घरीच बैलांची पूजा; पोळा सणाचा उत्साह हरवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:34 AM2021-09-08T04:34:22+5:302021-09-08T04:34:22+5:30
बल्लारपूर : कोरोनामुळे दोन वर्षांपासून पोळा सणाचा उत्साह हरवला असल्याचे चित्र बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागात दिसून आले आहे. ...
बल्लारपूर : कोरोनामुळे दोन वर्षांपासून पोळा सणाचा उत्साह हरवला असल्याचे चित्र बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागात दिसून आले आहे. शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बांधव पोळा सण उत्साहात साजरा करतात. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पोळा सार्वजनिकरित्या साजरा करू नये अशा सूचना तहसील प्रशासनाने दिल्यामुळे ग्रामीण भागात जुनोना, आमडी, किन्ही, कोर्टी मक्ता, दहेली, मानोरा व काही ठिकाणी साधेपणाने पोळा भरला तर काही ठिकाणी नियमांचे पालन करीत शेतकऱ्यांनी घरीच बैलांना सजवून पूजा केली. मानोरा ग्रामपंचायतचे सदस्य ऋषी पिपरे यांनी सांगितले की, आमच्या गावात दरवर्षी २०० जोड्यांचा बैल पोळा भरत असे. परंतु कोरोनामुळे पोळ्याचा उत्साह हरवला आहे मारोतीच्या देवळाजवळ २० जोड्या आणून प्रदक्षिणा घालून त्याही लगेच मागे परताव्या लागल्या. तर काहींनी घरीच पूजा केली. बल्लारपूर व बामणी गावातही शुकशुकाट होता.
070921\manora-pola.jpg
मानोरा येथे भरलेला बैलपोळा