दुर्गापुरातील अतिक्रमणावर बुलडोझर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 10:47 PM2019-01-04T22:47:50+5:302019-01-04T22:48:18+5:30
दुर्गापुरातील बेंडले यांच्या मोकळ्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले होते. बेंडले यांनी अतिक्रमणधारकांना अनेकदा अतिक्रमण हटविण्यास सांगितले. मात्र त्यांनी अतिक्रमण हटविले नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. दरम्यान गुरुवारी पोलीस बंदोबस्तात जेसीपीच्या सह्याने अतिक्रमण हटविण्यात आले. मात्र अतिक्रण हटविल्याने तणाव निर्माण झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दुर्गापुरातील बेंडले यांच्या मोकळ्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले होते. बेंडले यांनी अतिक्रमणधारकांना अनेकदा अतिक्रमण हटविण्यास सांगितले. मात्र त्यांनी अतिक्रमण हटविले नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. दरम्यान गुरुवारी पोलीस बंदोबस्तात जेसीपीच्या सह्याने अतिक्रमण हटविण्यात आले. मात्र अतिक्रण हटविल्याने तणाव निर्माण झाला होता.
दुर्गापुरात बेंडले यांची मोठी जागा आहे. मोकळ्या असलेल्या या जागेवर परिसरातील अनेकांनी अतिक्रमण केले. जवळपास ४० ते ५० घरे या जागेवर आहेत. अतिक्रमण हटविण्याबाबत बेंडले यांनी कित्येकदा प्रयत्न केले. मनपा, जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायतीकडे ते हटविण्याबाबत निवेदन दिले होते. मात्र, ते अतिक्रमण हटविण्यात आले नाही. त्यामुळे बेंडले न्यायालयात गेले. गेल्या काही वर्षापासून हे प्रकरण न्यायालयात होते. गुरुवारी न्यायालयाने बेंडले यांच्या जागेवर असलेले अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले. त्यानंतर पोलीस बंदोबस्त्यात अतिक्रमण हटवा मोहीम राबविण्यात आली. प्रारंभी पक्की घरे तोडण्यास अनेकांनी विरोध दर्शविला. मात्र, न्यायालयाच्या निर्णयापुढे सर्वच हतबल होते. दुसºया दिवशीही त्याठिकाणी पोलिसांचा ताफा उपस्थित होते.