एक कोटींच्या दारुसाठ्यावर चालला बुलडोजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:28 AM2021-04-08T04:28:51+5:302021-04-08T04:28:51+5:30
चिमूर : दारूबंदी असलेल्या जिल्ह्यातील चिमूर पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण ४६७ दारुबंदी गुन्ह्यातील एक कोटी ३४ लाख ५४ हजार ...
चिमूर : दारूबंदी असलेल्या जिल्ह्यातील चिमूर पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण ४६७ दारुबंदी गुन्ह्यातील एक कोटी ३४ लाख ५४ हजार ५८० रुपयांचा अवैध दारूच्या मुद्देमालावर मंगळवारी तिरखुरा रोडवर रोडरोलर चालवून खड्यात पुरविण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्यात पाच वर्षाअगोदार संपूर्ण दारूबंदी केली होती. मात्र दारू शौकिनाची लत भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दारुची अवैध विक्री सुरु झाली. पूर्वी परवानाधारक दुकानातच दारू मिळायची आता गल्लीबोळात दारू मिळत आहे. याविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम राबवित सन २०१५ ते २०१९ पर्यंत केलेल्या कारवाईतील ४०७ गुन्ह्यातील अवैध दारूच्या मुद्देमालावर बुलडोजर चालविण्यात आला. त्यानंतर संपूर्ण मुद्देमाल जवळील खड्ड्यात पुरण्यात आला. यावेळी राज्य उत्पादन शुल्क वरोराचे दुय्यम निरीक्षक ए. ए. तोंडे, ए.एस.आय चंदन भगत, किशोर पेदुजवार, दिलदार रायपूरकर, अंबादास देवतळे, ठाणेदार रविंद्र शिंदे, एपीआय मंगेश मोहोड, एपीआय अलीम शेख, कैलास आलाम, दिलीप वाळवे, सचिन गजभीये, शैलेश मडावी आदी उपस्थित होते