५० लाखांच्या दारुवर चालविला बुलडोजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:11 PM2019-03-13T22:11:24+5:302019-03-13T22:11:49+5:30
सावली तालुक्यात पोलिसांनी जप्त केलेल्या ४९ लाख ५२ हजार ५५० रुपयांचा दारूसाठा राज्य उत्पादन शुल्क विभाग वरोराचे प्रभारी निरीक्षक तसेच सावलीचे पोलीस निरीक्षक स्वप्निल धुळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी नष्ट करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : सावली तालुक्यात पोलिसांनी जप्त केलेल्या ४९ लाख ५२ हजार ५५० रुपयांचा दारूसाठा राज्य उत्पादन शुल्क विभाग वरोराचे प्रभारी निरीक्षक तसेच सावलीचे पोलीस निरीक्षक स्वप्निल धुळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी नष्ट करण्यात आला.
सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्निल धुळे यांनी अवैध दारुविक्रेत्यांविरुद्ध विशेष कारवाईची मोहीम राबविली होती. या मेहिमेत त्यांनी अनेक दारुविक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या. ठाणेदार धुळे यांच्या पथकाने काही महिन्यात १२३ कारवाईत ४६ लाख ९५ हजार ६०० रुपये किंमतीच्या ९० एमएल देशी दारूच्या ४६ हजार ९५६ प्लास्टिक बॉटल, दोन लाख ३२ हजार ५०० रुपये किंमतीच्या १८० एमएल दारुच्या ७७५ बॉटल, १४ हजार ७०० रुपये किंमतीच्या ९० एमएल विदेशी दारूने भरलेल्या ९८ प्लास्टिक बाटल्या, ९ हजार ७५० रुपये किंमतीच्या ३९ टिनाच्या कॅन बिअर असा एकूण ४९ लाख ५२ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल सावली जुन्या पोलीस स्टेशनच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात रोडरोलर चालवून पंचासमक्ष नष्ट करण्यात आल्या. यावेळी राज्य उत्पादन शुल्क वरोराचे प्रभारी निरीक्षक ए. डब्ल्यू. क्षीरसागर, पोलीस निरीक्षक स्वप्निल धुळे, पोलीस उपनिरीक्षक टेकाम, रामदास कोंडबत्तुनवार, कन्नाके, करमनकर, सुमित, विजय, प्रफुल्ल, दीपक, प्रिती उपस्थित होते.
१९ लाखांची दारु जप्त
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खंजर मोहल्यात धाड टाकून १९ लाख ६४ हजार रुपयांचा दारुसाठा जप्त केला. याप्रकरणी विष्णू खंजर, गीताबाई खंजर, दिनेश खंजर या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरु आहे. खंजर मोहल्यात मोठ्या प्रमाणात दारुसाठा असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथक तयार करण्यात आले. दरम्यान बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास खंजर मोहल्ल्यात धाड टाकून देशी दारुच्या १६४ पेट्टया, ओसी ब्ल्युच्या २६ पेट्टया, १० पेट्या बिअर, नंबर वन एक पेटी, ओसी ब्ल्यु बंपर पाच पेट्या असा एकूण लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरु आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक शेख, पोलीस उपनिरिक्षक मोटेकर, दौलत चालखुरे, पद्माकर भोयर, कुंदनसिंह बावरी, महेंद्र भुजाडे ादींनी केली.