वाघाच्या हल्ल्यात बैल ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 10:34 PM2018-11-09T22:34:13+5:302018-11-09T22:34:54+5:30

खडसंगी शिवारात मागील काही दिवसांपासून पट्टेदार वाघाची दहशत पसरली आहे. अशातच परिसरात शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास सुभाष दोडके यांच्या शेतात वाघाने हल्ला करून गोरा ठार केला. या घटनेने पुन्हा शेतकरी भयभीत झाले आहेत.

The bulls killed in tiger attack | वाघाच्या हल्ल्यात बैल ठार

वाघाच्या हल्ल्यात बैल ठार

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये दहशत : वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
खडसंगी : खडसंगी शिवारात मागील काही दिवसांपासून पट्टेदार वाघाची दहशत पसरली आहे. अशातच परिसरात शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास सुभाष दोडके यांच्या शेतात वाघाने हल्ला करून गोरा ठार केला. या घटनेने पुन्हा शेतकरी भयभीत झाले आहेत.
मागील आठ दिवसांपासून खडसंगी व बरडघाट परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन होत आहे. खडसंगी येथील शेतकरी बबन कुबडे यांना शेतातून परत येत असताना गावापासून हाकेच्या अंतरावर वाघाचे प्रत्यक्ष दर्शन झाले. दरम्यान, वनविभागाच्या कर्मचाºयांंनी पाहणी केली असता शेतात वाघाचे पगमार्क आढळले. परिसरात सध्या कापूस वेचणी व धान कापणीची कामे जोरात सुरू आहे. या घटनेने शेतात काम करणाºया मजुरांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली. पीक काढणीच्या वेळात शेतमजूर कामांवर येण्यास नकार देत आहेत. शेतकरी चिंता व्यक्त करीत आहे. वनविभागाने येथून वाघाला हुसकावून लावण्याची मागणी आहे.

अन् ती अफवा निघाली
खडसंगी येथून ५ किमी असलेल्या परसोडी येथे सकाळपासून जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. वनविभागाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाला भ्रमनध्वनी वरून अज्ञात इसमाने परसोडी शिवारात वाघाला विजेचा धक्का लागल्याची माहिती दिली होती. यावरून परिसरात गस्तीसाठी कर्मचाºयांचा ताफा पाठविला. यामध्ये एक क्षेत्र सहायक, तीन वनरक्षक व चार चौकीदार होते. चार वाजेपर्यंत राबविण्यात आलेल्या या गस्तीत परिसर पिंजून काढला. मात्र कुठेही वाघ व संशयास्पद ठिकाण आढळून आले नाही.सकाळी आठ वाजतापासून खडसंगी परिसरातील नागरिक शिवारात पोहोचले. वाघ प्रत्यक्ष बघण्याच्या हव्यासाने हजारो नागिरक विविध वाहनांनी परसोडीच्या दिशेने येत होते. एरव्ही व शांतता असणाऱ्या गावाला जत्रेचे स्वरूप आले होते.
ताडाळीतही बैल ठार
ताडाळी : ताडाळी परिसरात वाघाने हल्ला करून एक बैल ठार केल्याची घटना ताडाळी शिवारात मंगळवारी सकाळी घडली. मिलिंद गजानन खांडाळकर हे बैलजोडीला शेतात घेऊन गेले. बैलांना शेतातील खुंटीला बांधून घराकडे परत आले. त्यानंतर अर्ध्या तासाने शेतात गेले असता वाघाने बैलावर हल्ला करून ठार केल्याचे दिसून आले. वनविभागाच्या चमूने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याचदिवशी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास ताडाळी येथील मेंढपाळ शेळ्या व मेंढ्या घेऊन चराईला जंगलात गेला होता. वाघाने एका शेळीवर हल्ला केला. परंतु मेंढपाळाच्या समयसूचकतेने वाघाने पळ काढला. रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास एमआयडीसीतील जल शुद्धीकरण केंद्र व नंतर धारिवाल विद्युत निर्मिती प्रकल्पानजिक रेल्वे फाटक व टी पॉर्इंट परिसरात वाघ दिसल्याची चर्चा आहे.

पट्टेदार वाघाचे शिवारात होणारे दर्शन व वाघाने ठार केलेल्या घटनेने शेतकऱ्यांसह मजुरवर्ग शेतकामावर जाण्यास घाबरत आहेत. पीक काढणीचा हंगाम सुरू असून कामे प्रभावित होत आहेत, या कडे वनविभागाने लक्ष देऊन वाघाचा बंदोबस्त करावा.
- प्रमोद श्रीरामे, उपसरपंच

Web Title: The bulls killed in tiger attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.