एकाच प्रभारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर २२ गावांचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:21 AM2021-06-01T04:21:05+5:302021-06-01T04:21:05+5:30

प्रकाश पाटील मासळ (बु) : राष्ट्रीय उद्यान ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी बफर झोनलगत मासळ परिसर असून, याच परिसरातील ...

The burden of 22 villages on a single in-charge veterinary officer | एकाच प्रभारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर २२ गावांचा भार

एकाच प्रभारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर २२ गावांचा भार

Next

प्रकाश पाटील

मासळ (बु) : राष्ट्रीय उद्यान ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी बफर झोनलगत मासळ परिसर असून, याच परिसरातील मासळ (बु), पळसगाव, वडसी या तीन गावात पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. येथे अनेक गावांतील पशुपालक आपल्या जनावरांना उपचारासाठी आणतात. मात्र, तिन्ही गावांतील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मागील अनेक वर्षांपासून रिक्त असल्याने २२ गावांचा कारभार एकच प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी सांभाळत आहेत. त्यामुळे स्थायी डॉक्टरांची नियुक्ती व परिचर पदे भरावीत, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.

मासळ परिसरातील पळसगाव, मासळ (बु.), वडसी या तिन्ही पशुदवाखान्याअंतर्गत २२ गावांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकरी आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे ३ ते ४ जनावरे आहेत. जनावरांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना दवाखान्यात न्यावे लागते. मात्र, या तिन्ही पशुदवाखान्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्याने जांभूळघाट येथील पशुवैद्यकीय अधिकारी ज्ञानेश्वर कावळे यांच्याकडे पदभार आहे, तर पशुवैद्यकीय अधिकारी नसताना याच दवाखान्यातील परिचराच्या भरवशावर संपूर्ण दवाखान्याचा भार असतो. परंतु वडसी येथील परिचर पद एका वर्षापासून रिक्त आहे, तर मागील अनेक दिवसांपासून मासळ येथील परिचर अर्जित रजेवर आहेत. त्यामुळे जनावरांवर वेळीच योग्य उपचार होत नाहीत.

आता काही दिवसांपूर्वी खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीला सुरुवात झाली. अशा परिस्थितीत जनावरांचे आरोग्य बिघडू नये, त्यांच्यावर वेळीच उपचार व्हावा, यासाठी मासळ परिसरातील पळसगाव, मासळ (बु.), वडसी या तिन्ही पशुदवाखान्यातील डॉक्टर व वडसी, मासळ (बु.) येथील परिचर पदे भरावीत तसेच या ठिकाणी स्थायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी मासळ परिसरातील पशुपालक शेतकरी करीत आहेत.

बॉक्स

मुक्या जनावरांचा वाली कोण?

परिसरातील पळसगाव येथील डॉक्टराचे पद मागील एका वर्षापासून रिक्त असून, वडसी येथील डॉक्टर, परिचर पदे चार वर्षांपासून रिक्त आहेत. मासळ (बु.) येथील डॉक्टराचे पद तीन वर्षांपासून रिक्त आहे, तर येथील परिचर मागील अनेक महिन्यांपासून प्रकृती बरी नसल्याने रजेवर आहेत. या तिन्ही पशुवैद्यकीय दवाखान्यांचा प्रभार असलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी ज्ञानेश्वर कावळे यांच्याकडे चिमूर येथील पशुधन पर्यवेक्षक पदाचा भारसुध्दा आहे. त्यामुळे आजारी जनावरांचे हाल होत आहेत.

Web Title: The burden of 22 villages on a single in-charge veterinary officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.