ट्रान्सफॉर्मर जळाल्याने वेकोलिला कोट्यवधीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:20 AM2021-07-10T04:20:24+5:302021-07-10T04:20:24+5:30
माजरी : वेकोलि, माजरी परिसरातील वीज पुरवठ्यासाठी उभारण्यात आलेले के. व्ही. ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम अत्यंत गतीने सुरू ...
माजरी : वेकोलि, माजरी परिसरातील वीज पुरवठ्यासाठी उभारण्यात आलेले के. व्ही. ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम अत्यंत गतीने सुरू होते; परंतु चुकीच्या नियोजनामुळे ट्रान्सफॉर्मरच जळून खाक झाले. त्यामुळे माजरी परिसर मागील चार दिवसांपासून अंधारात बुडाला आहे.
माजरीत पाण्याची सोय नसल्याने वेकोलि चंद्रपूरवरून १२५ के.व्ही. जनरेटर भाड्याने आणून वेकोलि रुग्णालय परिसर, विनायकनगर आणि ए टाइपमध्ये पाणी दिले जात आहे, तसेच रात्री उशिरा वर्धा नदीच्या काठावर मोटारला जनरेटर लावून नदीचे पाणी वाॅटर फिल्टरपर्यंत पोहोचविण्यात आले. शुक्रवारी दिवसभर वेकोलि कर्मचारी-अधिकारी माजरीत पाण्याची सोय व्हावी याकरिता मोठी कसरत करीत होते. चारगाव, तेलावसा, ढोरवासा वसाहतीत भद्रावतीवरून पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून माजरीच्या काही वसाहतीत टँकरने पाणी देण्यात येत आहे.
दरम्यान, वेकोलिच्या मूरपार खाणीतून आणि खापरखेडा खाणीतून शुक्रवारी पुन्हा दोन अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बोलावण्यात आले असून हे काम युद्धस्तरावर सुरू आहे. या दोन दिवसांत कोळसा उत्पादन व कार्यालयीन कामकाज सर्व ठप्प पडून आहे. यामुळे वेकोलिचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.
090721\img_20210709_130856.jpg
वीन बसवलेला ट्रान्सफॉर्मर जळाले,
कोळसा उत्पादन व पाणीपुरवठा ठप्प.
जनरेटर लावून पाण्यासाठी जम्बो कसरत
वेकोलीला कोट्यवधींचे नुकसान