बसचा अपघात, एक ठार, १४ जखमी
By admin | Published: May 31, 2016 01:12 AM2016-05-31T01:12:30+5:302016-05-31T01:12:30+5:30
नादुरूस्त अवस्थेत रस्त्यावर उभे असलेल्या ट्रकला एसटी बसची धडक बसली. या अपघातात एक जण जागीच ठार तर
नागभीड : नादुरूस्त अवस्थेत रस्त्यावर उभे असलेल्या ट्रकला एसटी बसची धडक बसली. या अपघातात एक जण जागीच ठार तर १३ जण जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजता मोहाळीजवळ घडली. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.
सचिन उर्फ एकनाथ मुर्लीधर निकुरे (२३) रा. नवखळा असे मृताचे नाव आहे तर महेश बाबाजी तडके (२५), जितेंद्र शंकर वासनिक (२२) रा. पवनी, अतुल गुलाब निंबाळकर (३२) ब्रह्मपुरी, दिनदयाल (३२), दादाजी जयराम पवनीकर (३२) गडचिरोली, भाग्यश्री सुनील चिल्लुरे (३७) रा. लाखणी, करिष्मा राजेश ठाकरे (१७) रा. नागपूर, कमलेश मुलकंद मुळे (२८), किरण कमलेश मुळे (२०) रा. ब्रह्मपुरी, वसंत संभाजी कोहपरे (३४), विजय सत्यवान (३७) नागपूर, सोपान परशुराम उरकुडे (३०) रा. गडचिरोली, कालीदा नामदेव शेंडे (४५), नामदेव किसन शेंडे (५२) रा. सुलेझरी आणि साजिद बबलू शेख (१७) अशी जखमींची नावे आहेत.
गडचिरोली एसटी आगाराची नागपूर-गडचिरोली एमएच ४० ए.क्यू. ६२६६ या क्रमांकाची बस गडचिरोलीकडे जात असाना मोहाळीजवळ नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या एका ट्रकला धडक दिली. घटना गावाजवळील असल्याने गावकऱ्यांच्या ही बाब त्वरित लक्षात आली.
लागलीच गावकरी मदतीसाठी धावले व मिळेल त्या वाहनाने जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलविले. मृतक हा नवखळा येथील रहिवासी असून तो दररोज ये-जा करीत होता. या घटनेची तक्रार पोलिसांत दाखल झाली असून पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)