बेरोजगारीवर मात करण्यासाठी आता मिळणार व्यवसाय प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:35 AM2021-06-09T04:35:47+5:302021-06-09T04:35:47+5:30

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, चंद्रपूरद्वारे ७ वी पास तसेच १८ वर्षे पूर्ण असलेल्या युवक व युवतींकरीता १४ ते २१ ...

Business training will now be available to overcome unemployment | बेरोजगारीवर मात करण्यासाठी आता मिळणार व्यवसाय प्रशिक्षण

बेरोजगारीवर मात करण्यासाठी आता मिळणार व्यवसाय प्रशिक्षण

Next

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, चंद्रपूरद्वारे ७ वी पास तसेच १८ वर्षे पूर्ण असलेल्या युवक व युवतींकरीता १४ ते २१ जून या कालावधीत ऑनलाईन शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

प्रशिक्षणामध्ये शेडची रचना, व्यवसायाचे फायदे, शेळी, गाय व कोंबड्याच्या विविध जाती, पैदास, निवड, प्रजनन, औषधोपचार, लसीकरण, निगा व संरक्षण प्रतिबंधक उपाय त्यांचे संगोपन व व्यवस्थापन, संतुलित आहार, जीवनसत्वाचे महत्व, संसर्गजन्य रोग व त्यावर उपचार तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजना, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, यशस्वी उद्योजक यांचे मार्गदर्शन आदीवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड, कार्यक्रम आयोजिका लक्ष्मी खोब्रागडे यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड यांनी कळविले आहे.

Web Title: Business training will now be available to overcome unemployment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.