२५ हजार क्विंटल तुरीची खरेदी
By admin | Published: April 18, 2017 12:48 AM2017-04-18T00:48:57+5:302017-04-18T00:48:57+5:30
जिल्ह्यात यावर्षी २५ हजार ५०० क्विंटल तूर खेरदी करण्यात आली. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती व वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते.
खरेदी बंद : चंद्रपुरात एफसीआय व वरोऱ्यात नाफेडचे खरेदी केंद्र
चंद्रपूर : जिल्ह्यात यावर्षी २५ हजार ५०० क्विंटल तूर खेरदी करण्यात आली. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती व वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. नाफेडने तुरी खरेदीसाठी १५ एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. नाफेडच्या आदेशानंतरच पुढे तूर खरेदी सुरू करण्यात येणार असल्याचे एका सूत्राने सांगितले.
चंद्रपूर जिल्हा धानाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु चंद्रपूर ते वरोरा हा कापूस, तूर पेरणीचा पट्टा आहे. हे लक्षात घेऊन जिल्ह्यात चंद्रपूर व वरोरा येथे खरेदी केंद्र उघडण्यात आले होते. दोन्ही खरेदी केंद्रावर १५ एप्रिलपर्यंत तूर खरेदी सुरू होती.
गेल्या आठवड्यात नाफेडने शेतकऱ्यांकडून तूर खेरदी बंद केली होती. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात अचलपूर बाजार समिती व चांदूरबाजार बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. बाजार समितीने ७ एप्रिल रोजी तूर खेरदी करण्यास नकार दिला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर तुरीचे २०० पोती टाकली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दुसऱ्या दिवशी अमरावती जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच वजनकाटा लावून काँग्रेसने प्रतिकात्मक तूर खेरदी केंद्र सुरू करून तेथे शेतकऱ्यांनी तूर विकली.त्यामुळे नाफेडने पुन्हा तूर खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)
चंद्रपूर बाजार समितीचीही खरेदी
चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर बाजार समितीने जिल्ह्यात सर्वाधिक तूर खरेदी केली आहे. १४ एप्रिलपर्यंत ९ हजार ५२४ क्विंटल तूर खरेदी झाली होती. १५ एप्रिलची खरेदी धरून व्यापाऱ्यांनी १० हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. या बाजार समितीच्या आवारातच एफसीआयतर्फे ९ हजार ९०० क्ंिवटल तूर खरेदी करण्यात आली. ही खरेदी विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने केली.
वरोऱ्यात साडेपाच
हजार क्ंिवटल
वरोरा बाजार समितीमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. तेथे ५ हजार ६०० किंटल तूर खेरदी करण्यात आली आहे. नाफेड व एफसीआयने एफएक्यू या दर्जाची तूर खेरदी केली आहे. तर चंद्रपूर बाजार समितीत व्यापाऱ्यांनी सर्वच प्रकारची तूर खरेदी केली.