पडत्या दरात कापूस खरेदी

By admin | Published: November 29, 2014 01:02 AM2014-11-29T01:02:22+5:302014-11-29T01:02:22+5:30

यावर्षी पावसाचे दडी मारली. सिंचनाची व्यवस्था नाही अशा बिकट अवस्थेत शेतातील थोडाफार निघालेला कापूस खासगी व्यापारी ...

Buy cotton at reduced rates | पडत्या दरात कापूस खरेदी

पडत्या दरात कापूस खरेदी

Next

राजुरा : यावर्षी पावसाचे दडी मारली. सिंचनाची व्यवस्था नाही अशा बिकट अवस्थेत शेतातील थोडाफार निघालेला कापूस खासगी व्यापारी पडत्या दरात खरेदी करुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणे सुरू केले आहे.
राजुरा तालुक्यात पणन महासंघाने कापूस खरेदी केंद्र सुरू न केल्यामुळे शेतकऱ्यांना आपली अडचण दूर करण्यासाठी व्यापाऱ्यांच्या घशात नेवून विकण्याची पाळी आली आहे. यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली. पावसाअभावी प्रथम पेरणी वाया गेली. उसणवारी करुन दुबारपेरणी केली. तेवढ्यात थोडाफार पाऊस पडल्याने कापसाचे झाडे चांगले डोलावयास लागले. नंतर मात्र पावसाने दडी मारली. तसेच कडक उष्णतेमुळे कापसाच्या झाडांना बोटावर मोजण्या इतके बोंड लागले. त्याची प्रथम वेचनी केली असता एकरी एक- दोन क्विंटल कापूस निघाला.
वेचनी दरात मजुरांनी मोठी वाढ केली. प्रति किलो पाच रुपये वेचनी करताना रक्कम द्यावी लागत आहे. त्या रक्कमेची शेतकऱ्यांना बेभाव कापूस विकावा लागत आहे.
सध्या खासगी व्यापारी प्रती क्विंटल ३ हजार ५०० ते ३ हजार ८०० दराजे कापूस खरेदी करीत आहे. देवाडा येथील व्यापारी पडत्या दरात कापूस खरेदी करुन आदिवासी व इतर शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहे. त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे बेभाव खरेदी व वजनाता दांडी मारली जात आहे. असे असतानासुद्धा शेतकऱ्यांना पर्याय नसल्यामुळे नाईलाजास्तव कापूस विक्री करुन गरज भागवानी लागत आहे.
शासनाकडून शेतकऱ्यांना हमी भाव वाढवून देण्याची आशा होती. शेतकऱ्यांनी महागडे बिज खरेदी करुन पेरणी केली. तसेच खत व औषधीच्या वाढलेल्या किमतीमुळे शेतकरी त्रस्त होता. त्यात पावसाने दडी मारल्यामुळे पिकाचे प्रमाण ५० टक्क्यावर आले आहे. जमिनीतील ओलावर नष्ट झाला. थंडी सुद्धा पडत नाही. उष्णतेमुळे झाडे वाळत आहे. सिंचनाची व्यवस्था नाही निसर्गाच्या कृपेवर सर्व अवलंबून असल्यामुळे दुसऱ्या वेचनीनंतर कापसाचे पीक संपुष्टात येणार आहे. त्यामुळे कापसावर केलेला खर्च सुद्धा निघणे अवघड झाले आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट दिसू लागले आहे. अशा कठीण परिस्थितीत कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे, असे संकट उद्भवले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांना शासनाच्या मदतीची गरज आहे. त्याच्या शिवाय जीवन जगणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना वाढीव दर देणे आवश्यक आहे. हाच एकमेव पर्याय शेतकऱ्यांना संकटातून काढू शकतो.
शेतकऱ्यांची बिकट स्थितीतून सुटका करण्यासाठी शासनाने खरेदी केंद्र सुरू करून प्रति क्विंटल सहा हजार रुपये दर देण्याची मागणी काँग्रेसचे कार्यकर्ते अ‍ॅड. अरुण धोटे यांनी शासनाकडे केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Buy cotton at reduced rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.