वनहद्द व वीज खांबावरुन केबलचे जाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 10:54 PM2017-09-16T22:54:43+5:302017-09-16T22:55:09+5:30
मनुष्य चैनीच्या वस्तुने निपून होण्याचे सुख भोगत आहे. याच चैनीच्या वस्तुपैकी एक असलेल्या दूरचित्रवाणी (टेलिव्हीजन) या मनोरंजन साधनाचा उपयोग सर्वत्र आवडीचा व गरजेचा बनला आहे.
वेदांत मेहरकुळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी : मनुष्य चैनीच्या वस्तुने निपून होण्याचे सुख भोगत आहे. याच चैनीच्या वस्तुपैकी एक असलेल्या दूरचित्रवाणी (टेलिव्हीजन) या मनोरंजन साधनाचा उपयोग सर्वत्र आवडीचा व गरजेचा बनला आहे. टेलिव्हीजनवर विविध वाहिन्यांचे कार्यक्रम प्रसारणास महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाºया केबल चालकांनी आपले अधिकाधिक ग्राहक काबीज करण्यासाठी शासन नियम पायदळी तुडवून ग्राहक व इतर जिवांची परवा न करता आपले नेटवर्कचे केबल जाळे धोकादायक स्थितीतून पसरविल्याचा प्रकार शहरासह दिसून येत आहे.
टेलिव्हीजन हे उपकरण आज जवळपास प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असून ती काळाची गरज व जीवनाचा एक अविभाज्य घटकच बनला आहे. मात्र या टेलिव्हीजनवर कुठलीही वाहिनी बघावयाची असल्यास केबल अथवा डिश सेवा वापरणे गरजेचे आहे. यात अधिकाधिक चॅनल्स बघण्यासाठी नागरिकांनी केबल नेटवर्कच्या जोडणीला पसंती दर्शविल्याने सर्वत्र मोठ्या शहराहून ग्रामीण खेड्यापर्यंत केबल नेटवर्कचे जाळे पसरलेले आहे. शहरासह संपूर्ण तालुक्यात केबल नेटवर्क सेवा आस्था इंटरप्राईजेसकडून सुरू आहे. सदर सेवा देणाºया या नेटवर्क संस्थेद्वारे शासन नियमान्वये सेट आॅफ बॉक्स वितरित केले. ंप्रत्येक ग्राहकाकडून सेट आॅफ बॉक्सची प्रत्येकी १५०० रुपये एवढी तगडी रक्कम वसुल करून त्यांना मुळ पावती दिलीच नाही. तसेच शहराच्या कानाकोपºयात चंद्रपूर शहरातून येणारा केबल वनहद्दीतील झाडे, टेलिफोन विभागाचे खांब, इलेक्ट्रीक खांब यावर बांधून पोहचविण्यात आला आहे. अनेक ठिकाणी धोकादायक स्थळी केबल जिवंत विद्युत ताराजवळ बांधल्याचे दिसून येते. तर वनहद्दीत झाडे वाकल्याने अनेक ठिकाणी केबल जमिनीवरुन हात पुरण्या इतका उंचावर आला आहे. यामुळे वनहद्दीत वावरणाºया वन्यप्राण्यांच्या जिवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर शहरासह खेड्यापर्यंत पसरविण्यात आलेले केबलचे जोडणी जाळे हे बहुतांश विद्युत खांबावरुन आधार घेत पसरविण्यात आल्याने वीज वितरण कंपनीच्या वायरमन व अन्य कर्मचाºयांना खांबावर चढ-उतार करण्यास कमालीचा अडचणीचा ठरत आहे. अनाधिकृत व कमी उंचीवरुन केबलचे मार्गक्रमण करून केवळ आपल्या मिळकतीसाठी केबल नेटवर्क संचालकांनी धोकादायक परिस्थितीत केबल वायर ओढून नागरिकांना व वाहतुकदारांना त्रस्त करून सोडल्याची ओरडही सुरू आहे. केबल नेटवर्क संचालकांचा हा प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहे.
केबल जोडणीधारक ग्राहकांकडून सदर नेटवर्क इंटरप्राईजेसकडून दर महा १८० रुपये वसुल केले जाते, तर देण्यात येणाºया पावतीवर कर, स्थिर आकारणी याबाबतचे रकाने देवूनही त्यात मूळ वसुली रक्कम न भरता केवळ दरमहा १८० रुपये वसुली रक्कमच लिहिल्या जाते.
केबल नेटवर्क संचालकांचा हा मनमानी कारभार जोरात सुरू असताना करमणूक विभाग मात्र मूग गिळून बसल्याचे चित्र आहे. चंद्रपूर शहरातून तब्बल ५८ किमी अंतरावर टाकण्यात आलेला केबल जर विद्युत प्रवाहीत तारांना स्पर्श झाल्यास अनेकांच्या घरच्या टेलिव्हीजन उपकरण, यासह अन्य साधनांना हानी पोहचण्याची दाट शक्यता काहींनी वर्तविली आहे. अशा केबल नेटवर्क प्रसारण संस्थेवर कठोर कार्यवाही करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
यासंबंधी अद्याप लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. तक्रार प्राप्त झाल्यास कारवाई करू.
- गोपाल राणा, शाखा अभियंता
वनहद्दीतून केबल नेण्याची परवानगी आपल दिली नसून वनहद्दीत केबल आढळल्यास यासंबंधीची कारवाई करू.
- डी. एस. राऊतकर,
आरएफओ धाबा