संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी दिली शाळेला भेट

By admin | Published: November 29, 2014 01:07 AM2014-11-29T01:07:52+5:302014-11-29T01:07:52+5:30

अहेरी तालुक्यातील कोत्तागुडम शाळेत शिक्षक जातच नसल्याने शाळाच उघडली नसल्याची बातमी २२ नोव्हेंबर रोजी लोकमतने प्रकाशित केली होती.

Cadre Development Officers visited the school | संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी दिली शाळेला भेट

संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी दिली शाळेला भेट

Next

जिमलगट्टा : अहेरी तालुक्यातील कोत्तागुडम शाळेत शिक्षक जातच नसल्याने शाळाच उघडली नसल्याची बातमी २२ नोव्हेंबर रोजी लोकमतने प्रकाशित केली होती. या वृत्ताची दखल घेत २३ नोव्हेंबरला सकाळीच अहेरीचे संवर्ग विकास अधिकारी चांदेकर यांनी कोत्तागुडम शाळेला भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची चौकशी केली. कोत्तागुडम शाळेत पाच विद्यार्थ्यांसाठी दोनच शिक्षक कार्यरत असल्याबाबत माहिती देण्यात आली होती. पत्तीगाव शाळेत नवीन शिक्षकाची नेमणूक दोन दिवसात करण्यात येणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तर कोत्तागुडम शाळेत पाच विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षकांची गरज नसल्याने या शाळेतून एका शिक्षकाची दुसऱ्या ठिकाणी नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी लोकमतला दिली. अहेरी तालुक्यात अनेक शाळांमध्ये शिक्षक नियमितपणे जातच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनीही या संदर्भात गंभीरपणे दखल घेतली असून अशा शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश बैठकीत दिले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Cadre Development Officers visited the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.