बंदर कोल ब्लॉक लिलाव रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 05:00 AM2020-06-27T05:00:00+5:302020-06-27T05:00:23+5:30
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तरेला बंदर कोल ब्लॉक आहे. हा कोल ब्लॉक लिलाव करण्यासाठी केंद्राने लिलाव प्रक्रियेत समाविष्ट केला आहे. या ब्लॉकमध्ये बंदर, शेडेगाव, अमरपुरी, मजरा व गदगाव परिसर येतो. या परिसरात वाघ व इतर वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. मेळघाट व बोर अभयारण्याला जोडणारा वन्यप्राण्यांचा भ्रमंती मार्ग म्हणून ओळखला जातो. याच मार्गावर कोळसा खाण झाली तर सर्व वन्यप्राण्यांच्या भ्रमण मार्ग बंद होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या बंदर कॉल ब्लॉकमुळे ताडोबातील वाघ व कॉरिडॉर बाधित होणार आहे. तत्कालीन सरकारने हे ब्लॉक दोनदा रद्द केले होते. मात्र, केंद्र सरकारने बंदर कोल ब्लॉकला लिलाव प्रक्रियेत सामील केले. त्यामुळे या प्रक्रियेतून बंदर ब्लॉक रद्द करण्याची मागणी तरूण पर्यावरणवादी मंडळ व विविध पर्यावरण संघटनांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तरेला बंदर कोल ब्लॉक आहे. हा कोल ब्लॉक लिलाव करण्यासाठी केंद्राने लिलाव प्रक्रियेत समाविष्ट केला आहे. या ब्लॉकमध्ये बंदर, शेडेगाव, अमरपुरी, मजरा व गदगाव परिसर येतो. या परिसरात वाघ व इतर वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. मेळघाट व बोर अभयारण्याला जोडणारा वन्यप्राण्यांचा भ्रमंती मार्ग म्हणून ओळखला जातो. याच मार्गावर कोळसा खाण झाली तर सर्व वन्यप्राण्यांच्या भ्रमण मार्ग बंद होणार आहे. त्यामुळे वन्यप्राणी गावाकडे कूच करतील. यातून मानव व वन्यजीव संघर्ष वाढेल. त्यामुळे ब्लॉक लिलाव प्रक्रियेतून बंदरला वगळावे, अशी मागणी तरूण पर्यावरणवादी मंडळाचे अमोद गौरकर, वीरेंद्र हिंगे, मोरेश्वर पांगुळ, पर्यावरण संवर्धन समितीचे कवडु लोहकरे, सुशांत इंदूरकर, मोहन सातपैसे, समीर बंडे, ताडोबा मित्र परिवारचे इमरान कुरेशी, बालाजी ढाकूनकर उपस्थित होते