कर्करोग तपासणी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:27 PM2019-03-11T22:27:27+5:302019-03-11T22:27:43+5:30

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्करोग (मुख, स्तन व मुख गर्भाशय) तपासणी मोहीम जागतिक कर्णबधिरता सप्ताह व पोषण आहार जागृती कार्यक्रम घेण्यात आला.

Cancer Check Expedition | कर्करोग तपासणी मोहीम

कर्करोग तपासणी मोहीम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्करोग (मुख, स्तन व मुख गर्भाशय) तपासणी मोहीम जागतिक कर्णबधिरता सप्ताह व पोषण आहार जागृती कार्यक्रम घेण्यात आला.
अध्यक्षस्थानी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बिसेन, उद्घाटक अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, शासकीय नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य कुळसंगे, माया आत्राम, डॉ. जोशी, डॉ. मोरे, डॉ. देवतळे, डॉ. अभय राठोड, जिल्हा कार्यक़्रम समन्वयक डॉ. अमित ढवस वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल राठी डॉ. पल्लवी बोंबले आदी उपस्थित होते.
३० वर्षांवरील महिला पुरूषांकरिता मौखिक तपासणी करण्यात आली. महिलांच्या स्तनाचा कर्करोग व मुख गर्भाशय कर्करोगाची लक्षणे, त्यावरील उपाययोजना, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्राथमिक तपासणी झालेल्या रूग्णांची जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रस्तरावर नव्याने तपासणी केली जाणार आहे. उपस्थित तज्ज्ञांनी आरोग्य सुविधांचीही माहिती दिली. समुपदेशक रामेश्वर बारसागडे यांनी आभार मानले.

Web Title: Cancer Check Expedition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.