मनपातील अर्हताधारक सफाई कामगारांना पदोन्नतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 11:36 PM2018-04-18T23:36:18+5:302018-04-18T23:37:03+5:30

शहर महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या अनेक सफाई कामगारांची शैक्षणिक पात्रता असूनही त्यांची अद्याप पदोन्नती झाली नाही. त्यामुळे अहर्ताधारक सफाई कामगारांची पदोन्नती करावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य सफाई कामगार संघटना शाखा चंद्रपूरची सोमवारी मनपा आयुक्तांसोबत बैठक पार पडली.

Candidate cleaning workers of the municipality wait for promotions | मनपातील अर्हताधारक सफाई कामगारांना पदोन्नतीची प्रतीक्षा

मनपातील अर्हताधारक सफाई कामगारांना पदोन्नतीची प्रतीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देसफाई कामगारांची बैठक : उपायुक्तांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहर महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या अनेक सफाई कामगारांची शैक्षणिक पात्रता असूनही त्यांची अद्याप पदोन्नती झाली नाही. त्यामुळे अहर्ताधारक सफाई कामगारांची पदोन्नती करावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य सफाई कामगार संघटना शाखा चंद्रपूरची सोमवारी मनपा आयुक्तांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी उपायुक्तांनी काही मागण्यांना मंजूरी दिली. तर काही मागण्यांवर विचार करुन निकाली काढण्याचे आश्वासन दिले.
सफाई कर्मचाऱ्यांना शासकीय सुट्टीचा लाभ देण्यात यावा, किंवा शासकीय सुट्टीच्या दिवशी काम केल्यास त्यांचा आर्थिक मोबदला देण्यात यावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेतंर्गत कर्मचाºयांना मोफत घरकुल देण्यात यावे, कालबद्ध आश्वासीत प्रगती योजनेचे लाभ १२ ते २४ वर्ष सेवा पूर्ण केलेल्या पात्र कर्मचाºयांना देण्यात यावा, सफाई कर्मचारी मोठ्या प्रमाणात घाण साफ करीत असतात. त्यामुळे त्यांना अस्वच्छ भत्ता लागू करण्यात यावा, स्वच्छता कर्मचारी उन्हात काम करीत असतात. परिणामी त्यांना उष्माघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे सफाई कर्मचाºयांच्या कामाच्या वेळेत बदल करण्यात यावा, बायोमॅट्रीक्स थम मशीनवर थम मारण्याची योग्य वेळ ठरवून देण्यात यावी, कर्मचाºयांचा वेळ ठरवलेला असेल तर ते योग्य वेळेवर आपले काम करु शकतील, त्यामुळे या कर्मचाºयांवर आर्थिक बोझा वाढणार नाही, तसेच अर्हताधारकांना पदोन्नती देण्यात यावी, अशा विविध मागण्या प्रलंबित आहे.
या सर्व प्रलंबित मागण्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान उपायुक्तांनी कामगार संघटनेच्या काही मागण्यांना मंजुरी दिली. तर उर्वरीत मागण्यांवर विचार करून लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी संघटना चंद्रपूर शाखाचे जिल्हाध्यक्ष सतीश असरेट, जिल्हा संघटक युवराव बिरीया, कोषाध्यक्ष निलेश नन्हेट, जिल्हा सदस्य विश्वनाथ महातव, सचिन नन्हेट, अरविंद बक्सरीया, सुनील महातव, सुनील राठोड, राजा खोडे, अमर दुलगज संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Web Title: Candidate cleaning workers of the municipality wait for promotions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.