शिक्षकच निघाला गांजा तस्कर; चंद्रपुरात १०३ किलो गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2022 09:20 PM2022-03-26T21:20:16+5:302022-03-26T21:20:51+5:30

Chandrapur News विद्यार्थ्यांना घडविणारा शिक्षकच खुद्द विद्यार्थ्यांना गांजा देऊन त्यांचे आयुष्य व्यसनात गुरफटत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Cannabis smuggler left by teacher; 103 kg cannabis seized in Chandrapur | शिक्षकच निघाला गांजा तस्कर; चंद्रपुरात १०३ किलो गांजा जप्त

शिक्षकच निघाला गांजा तस्कर; चंद्रपुरात १०३ किलो गांजा जप्त

googlenewsNext
ठळक मुद्दे दोघांना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चंद्रपूर : विद्यार्थ्यांना घडविणारा शिक्षकच खुद्द विद्यार्थ्यांना गांजा देऊन त्यांचे आयुष्य व्यसनात गुरफटत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अध्यापनाचे पवित्र कार्य साेडून गांजा तस्करी करणाऱ्या या शिक्षकासह अन्य एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी तेलंगणातून गडचिरोली मार्गे चंद्रपूर येथे गांजा तस्करी करताना चिचपल्ली गावाजवळ शनिवारी अटक केली. यावेळी १०३ किलो ८३९ ग्रॅम गांजासह सुमारे ४१ लाख १५ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शिक्षक श्रीनिवास नरसय्या मचेडी (५०), शंकर बलय्या घंटा (२९) दोघेही रा. मस्जीद वाडा, सुभाषनगर, मथनी, करीमनगर, तेलंगणा असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. परराज्यातून गडचिरोली मार्गावरून चंद्रपूरकडे दोन चारचाकी वाहनातून गांजा तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मिळाली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, सचिन गदादे यांच्या नेतृत्वात दोन वेगवेगळे पथक तयार करून मूल-चंद्रपूर रोडवर चिचपल्ली गावजवळील शेर-ऐ पंजाब ढाब्याजवळ पाळत ठेवली.

दरम्यान, होंडा सिटी गाडी क्र. एपी ९ बीई ११२२, मारुती स्विफ्ट गाडी क्र. एपी १० एबी २७६९ या दोन गाड्या थांबवून वाहनाची तपासणी केली असता दोन्ही वाहनांत एकूण ५१ पाॅकीटमध्ये १०३ किलो ८३९ ग्रॅम वजनाचा ३१ लाख १५ हजार १७० रुपये किमतीचा गांजा आढळून आला. पोलिसांनी दोन्ही वाहनांसह सर्व ४१ लाख १५ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपितांविरुद्ध कलम ८ (क), २० (ब) (क) एन.डी.पी.एस. ॲक्टनुसार पोलीस ठाणे रामनगर येथे गुन्हा दाखल करून अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, सचिन गदादे, राजेंद्र खनके, रमेश तोकला, नितीन साळवे, प्रकाश बल्की, संजय आतकुलवार, सुभाष गोहोकार, सुरेंद्र महंतो, गणेश भोयर, मिलिंद जांभुळे, गणेश मोहुर्ले, सतीश बगमारे, गोपीनाथ नरोटे, रवींद्र पंधरे, प्रांजल झिलपे, शेखर आसुटकर आदींनी केली.

Web Title: Cannabis smuggler left by teacher; 103 kg cannabis seized in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.