‘त्या’ नरभक्षक वाघिणीचे चपराळा अभयारण्याकडे ‘युटर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 10:58 PM2017-09-14T22:58:04+5:302017-09-14T22:58:28+5:30

सलग चार दिवसांपासून तालुक्यातील येनबोथला परिसरात ठाण मांडून बसलेल्या नरभक्षक वाघिणीने बुधवारी सकाळच्या सुमारास चपराळा अभयारण्याकडे युटर्न घेतल्याचे .....

'That' Cannibal Waghini's flutter sanctuary 'Uttera' | ‘त्या’ नरभक्षक वाघिणीचे चपराळा अभयारण्याकडे ‘युटर्न’

‘त्या’ नरभक्षक वाघिणीचे चपराळा अभयारण्याकडे ‘युटर्न’

Next
ठळक मुद्देसुटकेचा नि:श्वास : वनविभागाला मिळाले परतीचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी : सलग चार दिवसांपासून तालुक्यातील येनबोथला परिसरात ठाण मांडून बसलेल्या नरभक्षक वाघिणीने बुधवारी सकाळच्या सुमारास चपराळा अभयारण्याकडे युटर्न घेतल्याचे संकेत वनविभागाला पगमार्ग व रेडियो कॉलरद्वारे प्राप्त झाले. त्यामुळे वाघिणीच्या दहशतीत भयभीत झालेल्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
गोंडपिपरी तालुक्याच्या वैनगंगा सीमेवरील येनबोथला परिसरात वाघिणीने गेल्या चार दिवसांपासून ठाण मांडले होते. तर यावर उपाय योजना म्हणून वनविभागाचे बल्लारशा, चंद्रपूर व धाबा वनपरिक्षेत्राचे पथक त्या नरभक्षक वाघिणीवर नजर ठेवून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सज्ज होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने अत्याधुनिक ड्रोन कॅमेराचाही वापर केला. तर वेळीच रेडीयो कॉलरवर लोकेशन मिळत नसल्याने सायंकाळी व बुधवारी सकाळच्या सुमारास तैनात वनकर्मचाºयांनी त्या वाघिणीचा शोध घेतला असता, त्यांना नदीकाठावर परतीचे पगमार्ग मिळाले. तर दुपारच्या सुमारास वाघिणीने युटर्न घेत चपराळा अभयारण्याच्या सीमेत प्रवेश केल्याची माहिती वनविभागाला मिळाली.
गेल्या चार दिवसांपासून वनविभागाचे विभागीय वनाधिकारी राजेंद्र हिरे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी डी.एस.राऊतकर, क्षेत्र सहाय्यक नरेश भोवरे, तसेच धाबा वनपरिक्षेत्राचे कर्मचारी, बल्लारशा व चंद्रपूर येथून आलेले अतिशिघ्र दक्षता चमूच्या कर्मचारी नरभक्षक वाघिणीवर पाळत घेवून होते.
वाघिणीच्या परत जाण्यामुळे येनबोथला परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून आता नागरिकांनी भिती बाळगण्याची गरज नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. तसेच गेल्या चार दिवसांपासून या परिसरात सायंकाळच्या सुमारास बंद करण्यात येत असलेल्या कृषी पंपांना विद्युत पुरवठा पुर्ववत सुरू करण्यात आला असून परिसरातील नागरिकांनी कुठलीही भीती बाळगू नये, असे आवाहन क्षेत्र सहाय्यक नरेश भोवरे यांनी केले आहे.

Web Title: 'That' Cannibal Waghini's flutter sanctuary 'Uttera'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.