कोरपना तालुक्यात १२३ निराधारांची प्रकरणे मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:20 AM2021-07-18T04:20:24+5:302021-07-18T04:20:24+5:30
संजय गांधी विधवा व अपंग योजनेंतर्गत ३६, श्रावणबाळ योजनेंतर्गत ६०, इंदिरा गांधी विधवा योजनेंतर्गत ६, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेंतर्गत ...
संजय गांधी विधवा व अपंग योजनेंतर्गत ३६, श्रावणबाळ योजनेंतर्गत ६०, इंदिरा गांधी विधवा योजनेंतर्गत ६, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेंतर्गत १६, दुर्धर आजार परितक्त्या सिकलसेल घटस्फोटित योजनेंतर्गत ५ अशा १२३ प्रकरणे मंजूर, तर १२ प्रकरण नामंजूर करण्यात आले. नामंजूर असलेले प्रकरणात ज्या काही त्रुटी असेल त्याची पूर्तता ऑनलाईन सेतूमध्ये जाऊन करावी. तसेच अंध अंपग मतिमंद विधवा परितक्त्या वृद्ध सिकसेल दुर्धर आजार यांनी जास्तीत जास्त केसेस ऑनलाईन करून घ्यावे, असे आवाहन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष उमेश राजूरकर यांनी केले. याप्रसंगी पदसिद्ध सचिव तथा तहसीलदार महेंद्र वाकलेकर, नायब तहसीलदार प्रवीण चिडे, अव्वल कारकून राजेश ढोबळे, निशा सोयाम, देवा थेटे, प्रणिता मालेकर, अशासकीय मिलिंद ताकसांडे, आशिष वांढरे, कल्पना निमजे, सुहेल अली, प्रमोद पिंपळशेंडे, विलास आडे, अनिल निवलकर उपस्थित होते.