जात प्रमाणपत्र तपासणी कायदा चुकीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 11:16 PM2017-09-15T23:16:05+5:302017-09-15T23:16:23+5:30

महाराष्ट्र शासनाने केलेल्या जात प्रमाणपत्र तपासणी कायदा चुकीचा असून न्यायतत्त्वाला धरून नाही.

Caste Certificate Checking Act Wrong | जात प्रमाणपत्र तपासणी कायदा चुकीचा

जात प्रमाणपत्र तपासणी कायदा चुकीचा

Next
ठळक मुद्देबी.के. हेडावू : हलबा समाज समिती व आदिम कर्मचारी संघटनेची कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाने केलेल्या जात प्रमाणपत्र तपासणी कायदा चुकीचा असून न्यायतत्त्वाला धरून नाही. महाराष्ट्र शासनाने २००० च्या कायद्याद्वारा २००३ ला जातप्रमाणपत्र तपासणी समितीची निर्मिती केली. परंतु, या समितीच्या अन्यायकारक निर्णयाने अनेक हलबांचे कुटुंब उद्ध्वस्त केले. सक्षम अधिकाºयाने विहित नमुन्यानुसार निर्गमित केलेले जात प्रमाणपत्र तपासता येत नाही. जात प्रमाणपत्र तपासण्याची २००० च्या कायद्यात केलेली तरतूद चुकीची आहे. कलम ७९ नुसार असे प्रमाणपत्र मान्य केलेच पाहिजे, कारण ते प्रमाणपत्र सक्षम अधिकाºयाने दिलेले असते. घटनेच्या २६१ (अ) नुसार शासकीय अधिकाºयाने निर्गमित केलेल्या कुठल्याही दस्ताऐवजाला भारतभर प्रामाण्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन माजी उपसचिव महाराष्ट्र शासनी बी.के. हेडावू यांनी केले.
स्थानिक जलाराम भवन येथे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आदिम कर्मचारी संघटना उर्जानगर आणि आदिवासी हलबा समाज समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून बी.के. हेडावू बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त कार्यकारी अभियंता शरद सोनकुसरे उपस्थित होते. मार्गदर्शन करताना हेडावू म्हणाले, हलबांनी ‘कोष्टी’ हा व्यवसाय स्वीकारला परतु, कोष्टी हीच जात समजून हेतूपुरस्पर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने हलबांची कत्तल करणे सुरू केले आहे. २००० च्या कायद्याने बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेच्या मूळ ढाच्याला छेद दिला गेला, जेव्हा की १३ न्यायधिशांनी केशवानंद भारती केसमध्ये घटनेच्या मूळ ढाच्यात कोणताही बदल करता येत नाही, हे स्पष्ट केले आहे. म्हणजेच २००० च्या महाराष्ट्र शासनाने हेतुपुरस्पर तयार केलेला जातीविषयक कायदा घटनाविरोधी आहे हे स्पष्ट होते. असे ते म्हणाले.
याप्रसंगी हलबा समाज समितीचे अध्यक्ष पुंडलिक नंदूरकर, सचिव मनोहर धकाते, आदिम कर्मचारी संघटनेचे कार्यकारी सदस्य विलास निपाने, कार्याध्यक्ष जितेंद्र हेडावू तसेच दोन्ही संघटनांचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी अभिजित दलाल, राजू नंदनवार, योगेश धकाते, मधुकर कुंभारे, रेखा बल्लारपूरे, पूजा पराते, पुष्पा जुनोनकर, दुर्गा वैरागडे, रवी धकाते, राकेश कुंभारे, रमेश पराते, अजय नंदूरकर, सुनील धकाते आणि इतर कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यशाळेचे संचालन विलास निपाने यांनी प्रास्ताविक प्रा. डॉ. विजय सोरते यांनी तर आभार ज्योती खाडीलकर यांनी मानले.

Web Title: Caste Certificate Checking Act Wrong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.