जात प्रमाणपत्र कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी संपावर
By Admin | Published: June 23, 2014 11:47 PM2014-06-23T23:47:33+5:302014-06-23T23:47:33+5:30
आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर समाज कल्याण विभागामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्थापन करावी, या मागणीसाठी सामाजिक न्याय विभाग राजपत्रित अधिकारी संघटना
चंद्र्रपूर : आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर समाज कल्याण विभागामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्थापन करावी, या मागणीसाठी सामाजिक न्याय विभाग राजपत्रित अधिकारी संघटना तसेच कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे विद्यार्थी, पालक तसेच कर्मचाऱ्यांना मोठा संताप सहन करावा लागला.
सध्या शैक्षणिक सत्र सुरु होणार आहे. विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी जात प्रमाणपत्राची गरज असते. अशावेळीच हा संप पुकारण्यात आल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.
सोमवारी सकाळी ११ वाजता जात वैधता पळताळणी कार्यालय सुरु करण्यात आले. मात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोणतेही काम सुरु केले नाही. सोमवारी सकाळी जात प्रमाणपत्र घेण्यासाठी तसेच अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने या कार्यालयात विद्यार्थी, पालक आले. मात्र त्यांचा अर्ज घेण्यासाठी येथे कुणीही तयार नसल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला.
समाजकल्याण विभागाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षपी शासनाच्या अध्यादेशानुसार आता अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना अध्यक्षपद देण्यात येणार आहे तर सदस्य सचिव म्हणून संशोधन अधिकारी राहणार आहे. तर सदस्य म्हणून समाजकल्याण उपआयुक्त राहतील. या समितीमध्ये अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना अध्यक्षपद न देता सहआयुक्त पदनिर्माण करून त्यांना अध्यक्षपदी नियुक्ती द्यावी, अशी संघटनेची मागणी आहे. यामुळे कामात अडथळा येणार नसून समाजकल्याणचा विभाग केवळ याच विभागाकडे असावा, अशीही मागणी आहे.
सोमवार पासून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून दिवसभर कर्मचारी काळ्या फिती लावून कार्यालयात होते. शासन जोपर्यंत मागणी पूर्ण करणार नाही तोपर्यं संप सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे येत्या काही दिवसात विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्रासाठी वाट बघावी लागणार आहे. (नगर प्रतिनिधी)