बौद्ध धर्मात जाती व्यवस्थेला स्थानच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:26 AM2021-03-21T04:26:56+5:302021-03-21T04:26:56+5:30
चंद्रपूर : बौद्ध धर्म हा जातीविरहित धर्म असल्याने बौद्ध धर्मात जाती व्यवस्थेला स्थानच नाही, असा सूर यंदा होणाऱ्या जनगणनेच्या ...
चंद्रपूर : बौद्ध धर्म हा जातीविरहित धर्म असल्याने बौद्ध धर्मात जाती व्यवस्थेला स्थानच नाही, असा सूर यंदा होणाऱ्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर ‘भारतातील बौद्धांची भूमिका’ या विषयावर अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे यांनी आयोजित केलेल्या परिसंवादात मान्यवरांनी केला.
परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे केंद्रीय कोर कमिटीचे सदस्य अशोक टेंभरे, तर प्रमुख वक्ते म्हणून ॲड.सत्यविजय उराडे, इंजि. शेषराव सहारे, डॉ.बंडू रामटेके, प्रा.रवी कांबळे, प्रा.टी.डी. कोसे, राजकुमार जवादे, प्रा.दुष्यंत नगराळे, सुरेश नारनवरे, कोमल खोब्रागडे, मनोहर वनकर, गीता रामटेके, मृणाल कांबळे, ज्योती सहारे आदी उपस्थित होते. परिसंवादात समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष, त्याचबरोबर विविध सामाजिक धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांनी व प्रतिष्ठित समाजबांधवांनी आपले मत मांडले. या परिसंवादात बहुतांश वक्त्यांनी आपल्या मनोगतात बौद्धांनी आपला धर्म बौद्ध लिहावा, जातीच्या रखान्यात निरंक किंवा नो कास्ट असे लिहावे. बौद्ध धर्म हा जातीविरहित असल्यामुळे जातीचे लेबल बौद्ध अनुयायांची दूर करणे गरजेचे आहे, असे वक्त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले आहे. संचालन प्रेमदास बोरकर, प्रास्ताविक राजाभाऊ खोब्रागडे तर आभार महादेव कांबळे यांनी मानले.
कार्यक्रमाला अशोक निमगडे, विशालचंद्र अलोणे, सिद्धार्थ शेंडे, निर्मला नगराळे, ज्योती शिवणकर, प्रेरणा करमरकर, राजेश रंगारी, उमकांत घोडेस्वार, महादेव पुनवटकर, प्रेमदास रामटेके आदी उपस्थित होते.