चंद्रपुरात निघाला कँडल मार्च

By Admin | Published: May 22, 2016 12:38 AM2016-05-22T00:38:18+5:302016-05-22T00:38:18+5:30

काही दिवसांपूर्वी मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांना क्लीन चिट देण्यात आली.

Castle March at Chandrapur | चंद्रपुरात निघाला कँडल मार्च

चंद्रपुरात निघाला कँडल मार्च

googlenewsNext

सामाजिक संघटनांचा सहभाग : शहीद हेमंत करकरे यांच्या सन्मानार्थ आयोजन
चंद्रपूर : काही दिवसांपूर्वी मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांना क्लीन चिट देण्यात आली. त्याचा विरोध दर्शविण्यासाठी चंद्रपुरातील सामाजिक कार्यकर्ता राजेश बेले यांच्या नेतृत्त्वात शहीद हेमंत करकरे यांच्या सन्मानार्थ गुरुवारी सायंकाळी गांधी चौक ते जटपुरा गेट या मार्गाने कँडल मार्च काढण्यात आला. शहीद हेमंत करकरे यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाच्या आरोपींचे चेहरे उघडे पाडले. तसेच इतर बॉम्बस्फोटाबाबत असलेले पुरावेसुद्धा न्यायालयासमोर ठवले. असे असताना केंद्रात सत्ता बदल होताच शहीद हेमंत करकरे यांनी गोळा केलेले सर्व पुरावे न्यायालयासमोर न ठेवता, खरी माहिती लपवून प्रज्ञासिंग ठाकूर व कर्नल पुरोहित यांना बॉम्बस्फोट प्रकरणात क्लीन चीट देण्यात आली. त्यामुळे शहीद हेमंत करकरे यांच्या सन्मानार्थ येथे कॅन्डल मार्च काढण्यात आला.
या कॅन्डल मार्चला चंद्रपुरातील वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी चांगला प्रतिसाद दिला. कॅन्डल मार्चमध्ये प्रामुख्यने नितीन गाडगे, बळीराज धोटे, राजेश गावतुरे, अहमद सिद्धीक, सुमित ढोकपांडे, मनोज पोतराजे, प्रकाश रामटेके, सिराज खान, प्रणय मोहोड, संपत रामटेके, अमित फाले, अ‍ॅड.जगदीश खोब्रागडे, विनोद सोनटक्के, सतीश निमसरकार, तथागत पेटकर आदींनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)

Web Title: Castle March at Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.