जनावरांच्या अंगावर गोठा कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 11:31 PM2018-05-07T23:31:28+5:302018-05-07T23:31:28+5:30
राजुरा तालुक्यातील गोयेगाव येथे शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या वादळाने जनावरांच्या अंगावर गोठा कोसळून एका गायीचा जागीच मृत्यू झाला तर तीन जनावरे जखमी झाली. या घटनेत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : राजुरा तालुक्यातील गोयेगाव येथे शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या वादळाने जनावरांच्या अंगावर गोठा कोसळून एका गायीचा जागीच मृत्यू झाला तर तीन जनावरे जखमी झाली. या घटनेत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
राजुरा तालुक्यातील गोयेगाव येथील शेतकरी पुरुषोत्तम वनकर यांनी गावापासून एक कि.मी. अंतरावर शेतात जनावरांचा गोठा बांधला. या गोठ्यात नेहमीच जनावरे बांधली जातात. मात्र शनिवारी गोयेगाव शिवारात अचानक आलेल्या पाऊस व वादळाने पुरुषोत्तम वनकर यांच्या मालकीचा गोठा वाºयाच्या प्रचंड वेगाने उडून जनावरांच्या अंगावर कोसळला. यात एका गायीचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तीन जनावरे जखमी झाली.या घटनेत शेतकºयांच्या गोठ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर जनावरे जखमी झाल्याने शेतकºयांना त्याचा मोठा फटका बसला आहे. शेतकरी या ना त्या कारणाने नेहमीच आर्थिक विवंचनेत सापडला आहे. निसर्गाची अवकृपाही पाचवीलाच पूजली असल्याचे दिसून येत आहे.
रात्रीच्या सुमारास वादळ आले तेव्हा पुरुषोत्तम वनकर यांनी बैल घरीच बांधून ठेवले होते. त्यामुळे सुदैवाने बैलांचा जीव वाचला. नाहीतर सर्वच जनावरांवर काळाचा घाला झाला असता. या घटनेत शेतकºयांच्या जनावरांचे व गोठ्याचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
या घटनेचा पंचनामा गोयेगाव येथील तलाठी विनोद गेडाम यांनी केला आहे. यावेळी पोलीस पाटील अश्विनी सातपुते व गावकरी उपस्थित होते. यावेळी शासनाने शेतकºयांना आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकरी व गोयेगाववासीयांनी केली आहे.
सुदैवाने बैलांचा जीव वाचला
गोयेगाव शिवारात रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या वादळाने पुरुषोत्तम वनकर यांचा शेतातील गोठा जनावरांच्या अंगावर पडून एक गाय ठार झाली तर तीन जनावरे जखमी झाली. यात सुदैवाने बैल घरीच बांधून ठेवल्याने वाचले. नाहीतर बैलांचा नाहक जीव गेला असता.