पोषण आहार बनला गुरांचा चारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 11:41 PM2018-01-07T23:41:13+5:302018-01-07T23:41:34+5:30
शासनाच्या धोरणानुसार बालविकास प्रकल्प विभामार्फत अंगणवाडीला पोषण आहार दिला जातो.
आॅनलाईन लोकमत
सिंदेवाही : शासनाच्या धोरणानुसार बालविकास प्रकल्प विभामार्फत अंगणवाडीला पोषण आहार दिला जातो. कुपोषण मुक्त आणि गरोदर माताना सकस आहार देण्याचा शासनाचा हा प्रयत्न आहे. मात्र, ग्रामीण भागात हा आहार गुरांच्या तोंडी जात असल्याच दिसून येत आहे. हा आहार निकृष्ठ असल्याचा आरोप केला जात असून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जात आहे.
१ ते ३ वर्षे वयोगटातील मुलांना महिन्याला तीन किलो आहार देण्याचा शासनाचा आदेश आहे. यात उपमा ११७० ग्रॅम, बाल आहार १०४० ग्रॅम, शिरा ७८० ग्रॅम, दिला जातो.
गरोदर आणि स्तनदा मातांना साडेतीन किलो पोषण आहार देण्याच्या सूचना आहेत. अंगणवाडीतून मिळत असलेला पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे लाभार्थी गुरांना खाऊ घालत आहेत. बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने अंगणवाडी केंद्रांचे संचालन केले जाते. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये पोषण आहार पुरविला जातो. काही वर्षांपूवी अंगणवाडी पोषण अतिशय दर्जेदार मानला जात होता. मात्र, अलिकडे पोषण आहार पुरवठा करण्याचे कंत्राट राजकीय संबंधातून दिले जाते. त्यातून गैरव्यवहाराचे प्रकार घडत आहेत. बालकांच्या आरोग्याची कुणालाही काळजी उरली नाही. सध्या पुरविण्यात येणारा आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याने मुले खात नाहीत. बरेच पालक हा आहार जणावरांना घालत आहेत. मात्र, संबंधित अधिकाºयांनी या घटनेची अजुनही दखल घेतली नाही. या घटनेची चौकशी झाली पाहिजे.