बैलपोळ्याच्या दिवशीच गुरांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:33 AM2021-09-07T04:33:42+5:302021-09-07T04:33:42+5:30
देवाडा खुर्दमध्ये जनावरांना संसर्गजन्य रोगांची लागण पोंभुर्णा : पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द व रामपूर दीक्षित या गावातील जनावरे अज्ञात ...
देवाडा खुर्दमध्ये जनावरांना संसर्गजन्य रोगांची लागण
पोंभुर्णा : पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द व रामपूर दीक्षित या गावातील जनावरे अज्ञात संसर्गजन्य रोगाने ग्रस्त झाली आहेत. या रोगामुळे गावातील दहा जनावरे दगावली होती. बैलपोळ्याच्या तोंडावर जनावरे दगावत असल्याने पशुपालक चिंतित आहेत. पशू विभागाच्या वतीने गावात तत्काळ लसीकरण कॅम्प घेण्यात यावे, अशी मागणी सरपंच विलास मोगरकर यांनी केली होती. त्यानुसार बैलपोळ्याच्या दिवशीच देवाडा खुर्द गावात पशू विभागाच्या वतीने लसीकरण करण्यात आले.
देवाडा खुर्द व रामपूर दीक्षित या गावातील जनावरांना अज्ञात संसर्गजन्य रोगांची लागण झाली आहे. शेकडो जनावरे या आजाराने ग्रस्त होती. मागील दोन दिवसात गावातील दहा जनावरे दगावली आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून वेळेवर योग्य ते लसीकरण केले जात नसल्याची बोंब होती. गुरांना वेगवेगळ्या रोगांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या देवाडा खुर्द गावासह तालुक्यातील काही ठिकाणी जनावरांमध्ये खुरांचे संसर्गजन्य आजार प्रामुख्याने आढळून येत आहेत. गुरांना पाय व तोंड खुरी येण्याचे प्रमाण वाढले आहे. या आजारांचा परिणाम शेतीकामावर होत आहे. सोमवारी गावात लसीकरण कॅम्प लावून १४० गुरांचे लसीकरण करण्यात आले.
कोट
देवाडा खुर्द गावातील जनावरांना अज्ञात संसर्गजन्य रोगांची लागण झाली आहे. यामुळे दोन दिवसात दहा जनावरे दगावली. त्यामुळे संबंधित विभागाकडे लसीकरण करण्याची मागणी केली होती. बैलपोळ्याच्या दिवशी गावातील गुरांचे लसीकरण करण्यात आले.
- विलास मोगरकर, सरपंच, ग्रामपंचायत, देवाडा खुर्द
060921\img20210906101324.jpg
देवाडा खुर्द येथे बैल पोळ्याच्या दिवशी गुरांचे लसिकरण करतांना