रस्ते खोदकामामुळे नागरिकांना डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 10:21 PM2018-12-28T22:21:32+5:302018-12-28T22:21:49+5:30

शहर महानगरपालिका हद्दीत सद्या वेगवेगळ्या कामांकरिता सातत्याने खोदकाम सुरू आहे. यामुळे चांगल्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे काम त्वरीत करण्याची मागणी होत आहे. शहरात गटार योजना आणि इलेक्ट्रीक केबलसाठी खोदकाम झाल्यानंतर आता अमृत योजनेकरिता खोदकाम सुरू आहे. मात्र, पाइपलाइन टाकल्यानंतर ती बुजविल्यावर त्यावर जेसीबी किंवा रोलर फिरविला जात नसल्याने मातीच्या उंचवट्यावरुन वाहनधारकांना आपली वाहने घरापर्यंत नेण्यास अडचणी येत आहेत.

Causes of headaches due to road dug | रस्ते खोदकामामुळे नागरिकांना डोकेदुखी

रस्ते खोदकामामुळे नागरिकांना डोकेदुखी

googlenewsNext
ठळक मुद्देमातीचे उंचवटे : वाहने घरापर्यंत नेताना गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहर महानगरपालिका हद्दीत सद्या वेगवेगळ्या कामांकरिता सातत्याने खोदकाम सुरू आहे. यामुळे चांगल्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे काम त्वरीत करण्याची मागणी होत आहे.
शहरात गटार योजना आणि इलेक्ट्रीक केबलसाठी खोदकाम झाल्यानंतर आता अमृत योजनेकरिता खोदकाम सुरू आहे. मात्र, पाइपलाइन टाकल्यानंतर ती बुजविल्यावर त्यावर जेसीबी किंवा रोलर फिरविला जात नसल्याने मातीच्या उंचवट्यावरुन वाहनधारकांना आपली वाहने घरापर्यंत नेण्यास अडचणी येत आहेत.
विशेष म्हणजे, महापौरांच्या प्रभागात त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर नुकतेच अमृतपाणी पुरवठा योजनेसाठी खोदकाम झाले. मात्र पाइप टाकल्यावर मातीने बुजवितांना जेसीबी किंवा रोलर प्रेस न केल्याने रस्ता वाहतुकीस अडथळा येत आहे. नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. सर्वत्र धूळ पसरली आहे. खोदकामामुळे रस्ता अरुंद झाला असून, एकावेळी समोरून वाहन आल्यास दोन वाहने चालविणे कठीण झाले आहे. यासोबतच येथील नागरिकांना आपली वाहने घरात ठेवण्यात अडचणी येत असल्याने इतरत्र ठेवावी लागत आहेत. यातून वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अमृत कलश योजनेतील पाइपलाइन टाकण्यासाठी संपूर्ण शहरातील रस्ते खोदण्यात आले आहेत. मात्र पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाल्यावरही या रस्त्यांची व्यवस्थित डागडुजी करण्यात आलेली नाही. दरम्यान माऊंट कॉन्व्हेंट रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्याबाबत महापौर, आयुक्तांना काँग्रेस कमिटीचे सचिव उमाकांत धांडे यांनी केले आहे.

Web Title: Causes of headaches due to road dug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.