कोरपना पंचायत समितीत सीसीटीव्ही कॅमेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:20 AM2021-06-11T04:20:04+5:302021-06-11T04:20:04+5:30
यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नागरी वस्तीकरिता २ लाख ५० हजार रुपये किमतीचे, तर ग्रामीण वस्तीकरिता एक लाख ४० हजार ...
यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नागरी वस्तीकरिता २ लाख ५० हजार रुपये किमतीचे, तर ग्रामीण वस्तीकरिता एक लाख ४० हजार रुपये किमतीचे घर लाभार्थीना उपलब्ध होणार आहे. या घरांचे नेमके स्वरूप कसे असेल याचा नमुना डेमो हाऊस पंचायत समिती परिसरात तयार करण्यात येणार आहे. ज्यात लाभार्थी नागरिक मिळणाऱ्या घराचा नमुना पाहू शकणार आहेत. पंचायत समिती कार्यालयात २ लाख ९५ हजार रुपयांच्या जिल्हा निधीतून २० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
याप्रसंगी सभापती रूपाली तोडासे, उपसभापती सिंधू आस्वले, जि. प. सदस्या कल्पना पेचे, विना मालेकर, जिल्हा बँकेचे संचालक विजय बावणे, पंचायत समिती सदस्य शाम रणदिवे, माजी जि. प. सदस्य उत्तम पेचे, पंचायत समिती सदस्य संबा पाटील कोवे, माजी जि. प. सदस्य सीताराम कोडापे, सुरेश मालेकार, भाऊराव चव्हाण, गणेश गोडे, शैलेश लोखंडे, उमेश राजूरकर, रेखा घोडाम, शालिनी बोंडे आदी उपस्थित होते.