रमजान ईद साधेपणाने साजरी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:29 AM2021-05-12T04:29:40+5:302021-05-12T04:29:40+5:30
१३ एप्रिल, २०२१ पासून मुस्लीम धर्मीयांच्या पवित्र रमजान महिन्याचा प्रारंभ झाला. १३ किंवा १४ मे, २०२१ (चंद्रदर्शनावर अवलंबून) रोजी ...
१३ एप्रिल, २०२१ पासून मुस्लीम धर्मीयांच्या पवित्र रमजान महिन्याचा प्रारंभ झाला. १३ किंवा १४ मे, २०२१ (चंद्रदर्शनावर अवलंबून) रोजी रमजान ईद (इद उल फित्र) साजरी होणार आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मुस्लीम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तारसाठी मशीद अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता, सर्व धार्मिक कार्यक्रम आपआपल्या घरातच साजरे करावे. प्रशासनाने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधने घालून दिली. त्याचे तंतोतंत पालन करावे. राज्यात कलम १४४ लागू आहे. रात्रीची संचारबंदी असल्यामुळे या कालावधीत फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नये. रमजान ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करू नये. धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लीम समाजातील धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.