सार्डतर्फे वन्यजीव सप्ताह साजरा
By admin | Published: October 19, 2016 01:03 AM2016-10-19T01:03:33+5:302016-10-19T01:03:33+5:30
वन्यजीव क्षेत्रात कार्यरत असलेली सोशल अॅक्शन फॉर रूरल डेव्हलपमेंट (सार्ड) चंद्रपूर या संस्थेच्या वतीने..
चंद्रपूर : वन्यजीव क्षेत्रात कार्यरत असलेली सोशल अॅक्शन फॉर रूरल डेव्हलपमेंट (सार्ड) चंद्रपूर या संस्थेच्या वतीने वन्यजीव सप्ताहाचे आयोजन डॉ.पंजाबराव देशमुख विद्यालय येथे आयोजन करण्यात आले.
मंचावर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे स्वागत अधिकारी अरुण तिखे, प्रा.डॉ. योगेश्वर दुधपचारे, सार्डचे अध्यक्ष प्रकाश कामडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुवर्णा कामडे, सदस्य मंगेश लहामगे, संजय जावडे, मुख्याध्यापिका कलाताई गोंदे उपस्थित होते.
या सप्ताहात पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये निबंध आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. निबंध स्पर्धेत प्रथम वैभवी उरकुडे, द्वितीय ऐश्वर्या मडावी, तृतीय इशीका इप्पलवार, तर चित्रकला स्पर्धेत प्रथम निकीता राजनकर, द्वितीय यशोदीप खंडारे, तृतीय प्रेरणा फुलझेले यांनी पारितोषिक पटकाविले. शाळेतील सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेऊन उत्कृष्ट प्रतिसाद दिला. संचालन महेंद्र राळे व आभारप् ा्रदर्शन राजू थुलकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हर्षल तारगे, महेंद्र राळे, मनोज वारजूकर, घाटे, पटले, देवतळे, सचिन सावळे, साक्षी आस्वले, मंजू मोहले, मयूर चौखे, शारदा चुनार यांनी अथक परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
आठवलेंशी व्यसनमुक्तीवर चर्चा
चंद्रपूर : केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती संघटनेचे अध्यक्ष संजय बुटले यांनी शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन व्यसनमुक्तीबाबत चर्चा केली. यावेळी राज्य शासनाकडून व्यसनमुक्तीच्या शासकीय आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याने दारूचा महापूर वाहत आहे, असे ना. आठवले यांना सांगण्यात आले. संघटनेचे उपाध्यक्ष पंजाबराव भगत, संजय मुरस्कर, कृष्णा मेश्राम आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)