सिमेंट काँक्रिट रोड बांधकामाचा दर्जा निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 10:05 PM2019-03-09T22:05:33+5:302019-03-09T22:06:01+5:30

नगर परिषदेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते पराते हॉस्पिटलपर्यंत सुरु असलेले सिमेंट क्रॉकीटचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून अंदाजपत्रकाला डावलून सुरु आहे. असा आरोप करीत चौकशी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

Cement concrete road construction status is poor | सिमेंट काँक्रिट रोड बांधकामाचा दर्जा निकृष्ट

सिमेंट काँक्रिट रोड बांधकामाचा दर्जा निकृष्ट

googlenewsNext
ठळक मुद्देवरोरा येथील प्रकार : चौकशीसाठी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : नगर परिषदेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते पराते हॉस्पिटलपर्यंत सुरु असलेले सिमेंट क्रॉकीटचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून अंदाजपत्रकाला डावलून सुरु आहे. असा आरोप करीत चौकशी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
वरोरा नगर परिषदेतर्फे विशेष वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत डॉ. आंबेडकर चौक ते पराते हॉस्पिटलपर्यंत सिमेंट काँक्रीट रोडचे बांधकाम सुरु आहे. यासाठी सुमारे पाच कोटी ५३ लाख नऊ हजार ४८७ रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले झाले. सदर रस्त्याचे बांधकाम यवतमाळच्या एका कंपनीला देण्यात आला आहे. त्यानुसार सदर बांधकामाला सुरुवातही झाली आहे. परंतु, सदर बांधकाम करताना सुरुवातीपासूनच अंदाजपत्रकाचे निकष पाळण्यात आलेले नाही. बांधकामाची पाहण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने बांधकाम अभियंत्याची नेमणूक केली आहे. मात्र सदर अभियंता चालू कामाकडे फिरकत नाही. त्यामुळे काम निकृष्ट होत असल्याची नागरिकाची तक्रार आहे. सदर सिमेंट कांक्रीट रोडचे बांधकाम करताना जुना चांगल्या स्थितीत असलेला एका बाजूचा रोड पोखरून त्यावर थातूरमातूर खडीकरण त्यानंतर कांक्रीट टाकण्याचे काम सुरु आहे. हे मास कांक्रीटचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. अंदाजपत्रकानुसार मास काँक्रिटची जाडी अभियंत्याने १५० एम. एमची अंदाजपत्रकात ठरवून दिली आहे.
परंतु, बहुतांश ठिकाणी मास काँक्रिटची जाडी अंदाजे ७० ते ८० एमएमच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या कामात बराच घोळ असून चौकशी करण्याची मागणी परिसरतील नागरिकांकडून होत आहे.

सिमेंट काँक्रीट रोडचे बांधकाम मी अजून पाहिलेले नाही. याची जबाबदारी स्थापत्य अभियंत्याकडे आहे. निकृष्ट बांधकामाच्या तक्रारीसंबंधात सदरच्या कामात पाहणीकरिता अभियंत्याला सांगण्यात आले आहे. त्याच्याकडून तपशील मिळताच रोडचे बांधकामात काही कमी असल्यास त्याची पूर्तता करण्यात येईल.
- सुनील बल्लाळ, मुख्याधिकारी, न.प. वरोरा

सिमेंट काँक्रीट रोडचे बांधकामात कसली गडबड सुरु आहे. याची पडताळणी करुन काम योग्यप्रकारे ते करु.
- सुरज पुनवटकर
स्थापत्य अभियंता, न.प. वरोरा

Web Title: Cement concrete road construction status is poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.