देशभरातील ओबीसींची जनगणना करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 12:46 AM2019-08-09T00:46:16+5:302019-08-09T00:47:06+5:30
देशभरातील ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनातून करण्यात आली आहे. २०१० रोजी झालेल्या जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात यावी.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : देशभरातील ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
२०१० रोजी झालेल्या जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात यावी, सन २०२१ च्या राष्ट्रीय जनगणनेमध्ये ओबीसी वर्गाची जातनिहाय जनगणना करावी, सरकारी नोकरीतील ओबीसी, एससी व एसटी प्रवर्गाचा अनुशेष विशेष अभियान राबवून तातडीने भरावा, एससी व एसटी प्रवर्गाप्रमाणे ओबीसी विद्यार्र्थ्याना शंभर टक्के शिष्यवृत्ती द्यावी, आर्थिक व सामाजिक विकासासाठी ओबीसी समाजाला संविधानातील तरतुदीनुसार न्याय द्यावा. एससी व एसटीप्रमाणे ओबीसी शेतकरी व शेतमजुरांना शासनाच्या विविध योजनांचा फायदा देण्यात यावा, ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण लागू करावे, कोणत्याही सार्वजनिक उद्योगाचे खासगीकरण करू नये, खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांना देण्यात आले. निवेदन देताना अॅड. गोविंद भेंडारकर, मोंटू पिलारे, मकरंद राखडे, भाऊराव राऊत, राकेश शेंडे, किशोर हजारे, दामोदर बहेकार, मिथुन चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, ज्ञानेश्वर बागमारे, सुदाम राठोड, चंदू बुल्ले, अरविंद नागोसे, रवींद्र,्र तलमले, डाकराम ठाकरे, वामनराव उके, प्रेमराज दर्वे आदी उपस्थित होते.