केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ गावागावांत पोहोचवा!

By admin | Published: September 27, 2016 12:48 AM2016-09-27T00:48:05+5:302016-09-27T00:48:05+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाकरिता अनेक महत्त्वाकांक्षी आणि लोकाभिमुख योजना सुरू केल्या आहेत.

Center and state government schemes should be benefitted in villages! | केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ गावागावांत पोहोचवा!

केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ गावागावांत पोहोचवा!

Next

हंसराज अहीर : भाजप कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाकरिता अनेक महत्त्वाकांक्षी आणि लोकाभिमुख योजना सुरू केल्या आहेत. भाजपप्रणित महाराष्ट्र सरकारने अनेक योजना सुरू करून त्या योजना सर्व स्तरावर पोहचविण्याचा प्रयत्न गतिमान प्रशासनाच्या माध्यमातून सुरू केला असला तरी या योजना प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्याची व या योजनांचा लाभ गावागावातील लाभार्थ्यांना मिळवून देण्याकरिता भाजपाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
गोंडपिपरी येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. २२ सप्टेंबर रोजी गोंडपिपरी येथील धनोजे कुणबी सभागृहात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आ. अ‍ॅड. संजय धोटे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरुनुले, भाजपा नेते बबनराव निकोडे, निलेश खरबडे, नगर पचायत अध्यक्ष संजय झाडे, अशोक चिचघरे, किशोर अगस्थी, राकेश पुंज, रामदास शेंडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, नगर पंचायत सदस्य व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
अवघ्या दोन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनांद्वारे देशाच्या विकासामध्ये आमुलाग्र परिवर्तन झाले असून देश विकासाच्या दिशेने झेपावला आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या दूरदृष्टी व दृढ संकल्पाचा हा परिणाम आहे. अर्थव्यवस्थेमध्ये सर्वच घटकांचे योगदान असल्याखेरीज राष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार नाही. ही भूमिका ठेवून प्रधानमंत्री यांनी रोजगार व स्वयंरोजगारावर भर देऊन प्रत्येक हाताला काम देण्याचे धोरण स्वीकारले असून येत्या पाच वर्षात त्यांचे हे स्वप्न साकार होतील, असेही हंसराज अहीर यांनी यावेळी सांगितले. शेती, उद्योग व अन्य संरचनांचा विकास करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी अनेक योजना अंमलात आणून त्या योजनांची अंमलबजावणी सक्तीपूर्वक करण्यास प्राधान्य दिले असले तरी भाजपप्रणित सरकारच्या या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आहे. या योजना सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्र्त्यांंनी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. भाजपाची सहकार क्षेत्रात भक्कमपणे उभारणी करण्यासाठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्था भाजपाच्या हातात सोपविण्यासाठी आतापासूनच कामाला लागण्याची गरज असल्याचे सांगत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी प्रधानमंत्र्यांची तसेच मुख्यमंत्र्यांची ‘सक्षम भाजप सक्षम भारत’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आगामी सर्वच निवडणुकामध्ये पक्षाला फार मोठे यश संपादन होईल, या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

Web Title: Center and state government schemes should be benefitted in villages!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.