जगन्नाथबाबा मठ सेवेची प्रेरणा देणारे केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:33 AM2021-08-17T04:33:51+5:302021-08-17T04:33:51+5:30
चंद्रपूर : युग बदलत असले तरी जगन्नाथबाबांवर प्रेम करणारा सेवेकरी वर्ग आजही सेवेचा वसा समोर नेत आहे. अशा सेवेकरी ...
चंद्रपूर : युग बदलत असले तरी जगन्नाथबाबांवर प्रेम करणारा सेवेकरी वर्ग आजही सेवेचा वसा समोर नेत आहे. अशा सेवेकरी समाजाची समाजानेही दखल घेतली आहे. या मठातून समाजप्रबोधनाच्या माध्यमाने सक्षमीकरणाचा, व्यसनमुक्तीचा, माणुसकीचा संदेश समाजात जात असून, हा मठ सेवेची प्रेरणा देणारे केंद्र असल्याचे मत आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. दरम्यान, समाज भवनासाठी ४५ लाख रुपये देणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. धानोरा येथील जगन्नाथबाबा मठ येथे घुगरी काला कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी सरपंच छाया वासाडे, सरपंच वैशाली मातणे, माजी सरपंच गणपत कुडे, बंडू चौधरी, प्रकाश येलबलवार, नामदेव बोबडे, नंदकिशोर वासाडे, चंद्रकांत खांडेकर, दशरथ बोडे, आनंदराव आस्वले, गणेश निखाडे, रवींद्र गोखरे, दिवाकर बोढे, रमेश ठावरी, नथ्थूजी बोंगाडे, सुरेश निखारे, गजानन बोढे, शंकर पोढे, गजानन मानूसमारे, राजू पिंपळशेंडे आदींची उपस्थिती होती.