जिवतीच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 12:05 AM2017-10-04T00:05:11+5:302017-10-04T00:05:24+5:30
अतिदुर्गम जिवती तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडवून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी शासन सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : अतिदुर्गम जिवती तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडवून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी शासन सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. सेवलागुडा येथे जगदंबादेवीची मूर्ती स्थापना व सेवालाल महाराज मंदिराचे कळसाचे उद्घाटन करतान ते बोलत होते.
यावेळी प्रमुख म्हणून राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अॅड. संजय धोटे, खुशाल बोंडे, राजेश रोडे, जिवती पंचायत समितीचे सभापती सुनिल मडावी, उपसभापती महेश देवकते, महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे, जिल्हा परिषद सदस्य कमल राठोड, पंचायत समिती सदस्या अंजना राठोड, सरपंच अनिता मस्के, केशव गिरमाजी, सुरेश केंद्रे, प्रल्हाद राठोड, गोपीनाथ चव्हाण, अशोक नाईक, अंतराम वाकळे आदी उपस्थित होते.
ना. हंसराज अहीर म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांनी योजनांचा लाभ घेऊन आर्थिक प्रगती करावी.
जिवती तालुक्यातील अनेक समस्या सुटत आहेत. कारण, केवळ योजना सुरू करून उपयोगाचे नाही. तर, अधिकारी व ग्रामस्थांच्या मदतीने अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असेही केंद्रीयमंत्री हंसराज अहिर यांनी नमूद केले.
बंजारा समाजाचे प्रेरणास्थान तपस्वी रामराव महाराज या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र, प्रकृती स्वास्थाअभावी उपस्थित राहु शकले नाही.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी सहकार्य केले. प्रास्ताविक रमेश राठोड तर, संचालन राजेश राठोड यांनी केले