पूरग्रस्त भागात पुन्हा केंद्रीय पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 05:00 AM2020-12-26T05:00:00+5:302020-12-26T05:00:42+5:30

३०, ३१ आॅगस्ट व १ सप्टेंबर या कालावधीत वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गोसेखुर्दचे ३३ दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे ब्रम्हपुरी, मूल, सावली, गोंडपिंपरी, सिंदेवाही या पाच तालुक्यांमध्ये कोटयवधीचे नुकसान झाले आहे. ब्रम्हपुरी तालुक्यात राज्य शासनाने केलेले पंचनामे, त्यानंतर केलेली मदत, पायाभूत सुविधांमध्ये झालेले नुकसान, त्यामध्ये करण्यात आलेली दुरूस्ती, आणखी पुढे लागणारी मदत या संदर्भात शुक्रवारी केंद्रीय पथकाने भेट देऊन पाहणी केली.  यापूर्वी ११ ते १३ सप्टेंबर या कालावधीत पथकाने भेट दिली होती. 

Central squad again in flooded areas | पूरग्रस्त भागात पुन्हा केंद्रीय पथक

पूरग्रस्त भागात पुन्हा केंद्रीय पथक

Next
ठळक मुद्देपरिसराची केली पाहणी : आतापर्यंत शासनाकडून ४२ कोटींची मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्रीय पथकाने शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. पूर येऊन गेल्यानंतरच्या कालावधीत शासनाकडून पंचनामे पूर्ण झाले आहेत. आत्तापर्यंत ४२ कोटींची मदत देण्यात आली. मात्र तरीही पायाभूत सुविधांमधील अनेक मोठी कामे अपूर्ण असून यासाठी आणखी मदतीची गरज असल्याची मागणी नागरिकांनी पथकापुढे शुक्रवारी केली.
३०, ३१ आॅगस्ट व १ सप्टेंबर या कालावधीत वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गोसेखुर्दचे ३३ दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे ब्रम्हपुरी, मूल, सावली, गोंडपिंपरी, सिंदेवाही या पाच तालुक्यांमध्ये कोटयवधीचे नुकसान झाले आहे. ब्रम्हपुरी तालुक्यात राज्य शासनाने केलेले पंचनामे, त्यानंतर केलेली मदत, पायाभूत सुविधांमध्ये झालेले नुकसान, त्यामध्ये करण्यात आलेली दुरूस्ती, आणखी पुढे लागणारी मदत या संदर्भात शुक्रवारी केंद्रीय पथकाने भेट देऊन पाहणी केली.  यापूर्वी ११ ते १३ सप्टेंबर या कालावधीत पथकाने भेट दिली होती. 
आजच्या दुसºया पाहणी पथकामध्ये पथक प्रमुख राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्लीचे सहसचिव रमेश कुमार घंटा, तसेच नवी दिल्ली येथील केंद्र शासनाच्या ग्राम विकास विभागाचे उपसचिव यश पाल, केंद्रीय वित्त मंत्रालयाचे आर.बी.कौल, कृषी विभाग नागपूरचे संचालक आर.पी. सिंग, नवी दिल्ली येथील रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे मुख्य अभियंता तुषार व्यास, जलशक्ती नागपूरचे अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे यांच्यासोबत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार,  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश  कुंभेजकर, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा व विविध विभाग प्रमुख सहभागी झाले होते.
 जिल्ह्यातील कृषी, पायाभूत सुविधा, रस्ते व पूल यांचे नुकसान याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाने लाडज, पिंपळगाव, बेलगाव येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करून शेतकºयांशी व गावकºयांशी संवाद साधला. 
विशेष म्हणजे, यावेळी बोटीने प्रवास करत केंद्रीयपथकाने लाडज येथील नुकसान झालेल्या शेताची व घरांची पाहणी केली. 
 

रस्ते व पुलाचे मोठे नुकसान
शेतकºयांना कृषी संदर्भातील नुकसानीसाठी प्राथमिक मदत राज्य शासनामार्फत देण्यात आली आहे. मात्र पायाभूत सुविधांमध्ये मोठया प्रमाणात झालेल्या नुकसानीची पाहणीदेखील आज करण्यात आली. याशिवाय या दौºयामध्ये पुरामुळे झालेल्या शेत नुकसानीबाबत विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उदय पाटील व मदत वाटपाबाबत उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, यांच्याकडून माहिती घेतली. हे पथक या पाहणीनंतर केंद्राला आपला अहवाल सादर करणार आहे.

३६ कोटींचे वितरण
राज्य शासनाने आतापर्यंत ४२ कोटींची मदत मंजूर केली. त्यापैकी ३६ कोटी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांना वितरित करण्यात आले आहेत. राज्य शासनाने या पुरामध्ये झालेल्या जीवितहानी, पशुधनाचे नुकसान, पूरग्रस्त भागामधील पुनर्वसन, तात्पुरता निवारा, कृषी मालाचे नुकसान, पुरानंतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप,  दुकानदारांना मदत अशा अनेक घटकांमध्ये आतापर्यंत ३६ कोटीचे वाटप केले आहे. उर्वरित सहा कोटी रुपयांचे  वितरण लवकरच करण्यात येत आहे.
 

Web Title: Central squad again in flooded areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर