सीईओंकडून सिंचन विहीर व शौचालयाच्या कामाची पाहणी
By Admin | Published: February 16, 2017 12:35 AM2017-02-16T00:35:01+5:302017-02-16T00:35:01+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. डी. सिंह यांनी नुकतीच सावली पंचायत समिती अंतर्गत हिरापूर, मोखाळा, व्याहाड खुर्द या गावांना भेट देवून...
लाभार्थ्यांशी चर्चा : अनुदान वेळेत अदा करण्याचे निर्देश
चंद्रपूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. डी. सिंह यांनी नुकतीच सावली पंचायत समिती अंतर्गत हिरापूर, मोखाळा, व्याहाड खुर्द या गावांना भेट देवून गावातील चालू असलेल्या सिंचन विहीर बांधकामाची पाहणी केली. यावेळी लाभार्थ्यांशी चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या.
जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन व सिचंन विहिरींच्या कामात गती निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. डी. सिंह यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी सावली पंचायत समितीला भेट देवून स्वच्छ भारत मिशन व सिंचन विहीर बांधकामाचा आढावा घेतला. यावेळी सावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल भोसले, सिंचाई विभागाचे कार्यकारी अभियंता सहारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता रवींद्र मोहिते उपस्थित होते.
मोहिते यांनी ग्रामसेवकांकडून स्वच्छ भारत मिशन विषयक आढावा घेतला. तसेच सभेत सावली तालुका हागणदारीमुक्त करण्याविषयीचे नियोजन करुन देण्यात आले. याशिवाय कामे वेळेत कशी पूर्ण करावी, याविषयी उपाययोजना करण्यासंबधी माहीती देण्यात आली. हिरापूर व मोखाळा या गावांना सीईओंनी भेटी देवून गावकऱ्यांमध्ये स्वच्छतेची जाणिव निर्माण करण्यासाठी लाभार्थ्यांशी चर्चा केली व शौचालयाचे भूमिपूजन केले. यावेळी बांधकाम पूर्ण झालेल्या शौचालयाची पाहणी करून व्याहाड खुर्द येथे सुरू असलेल्या सिंचन विहिरीच्या कामाची पाहणी केली. लाभार्थ्यांशी चर्चा करुन, अडचणी जाणुन घेतल्या. बांधकामाचा निधी लाभार्थ्यांना वेळेत देण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या. (स्थानिक प्रतिनिधी)