सीईओंनी घेतला नागभीड पं.स.च्या विकास कामांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:32 AM2021-09-04T04:32:53+5:302021-09-04T04:32:53+5:30
पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या या आढावा सभापती प्रफुल्ल खापर्डे, उपसभापती रागिनी गुरूपुडे, पं.स.सदस्य सुषमा खामदेवे, गट विकास अधिकारी संजय ...
पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या या आढावा सभापती प्रफुल्ल खापर्डे, उपसभापती रागिनी गुरूपुडे, पं.स.सदस्य सुषमा खामदेवे, गट विकास अधिकारी संजय पुरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद मडावी, बाल विकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र ठोंबरे, गट शिक्षण अधिकारी प्रमोद नाट, उपविभागीय अधिकारी(सिंचन) नील जाधव, पशु संवर्धन अधिकारी गिरीश गभणे यांची उपस्थिती होती.
या आढावा सभेत सर्व विभागांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे पूर्ण करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांनी दिल्या. प्रलंबित विद्युत लाईट बिल, गृहकर,पाणी कर, कर आकारणी नूतनीकरण, जल जीवन मिशन अंतर्गत शाळा आणि अंगणवाडी संदर्भात उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. वैद्यकीय विभागाने कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या उच्चाटनासाठी सज्ज असावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले. यावेळी पं.स. परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. या आढावा सभेचे प्रास्ताविक गट विकास अधिकारी संजय पुरी यांनी संचालन विस्तार अधिकारी (पंचायत) श्वेता प्रशांत राऊत यांनी तर आभार प्रदर्शन सहायक प्रशासन अधिकारी युवराज मदनकर यांनी केले.
030921\img-20210903-wa0023.jpg
आढावा घेत असतांना मिताली सेठी