सीईटी अर्जाची मुदत आधी, बारावीचा निकाल नंतर;अनेक विद्यार्थ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:31 AM2021-08-13T04:31:59+5:302021-08-13T04:31:59+5:30

अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व औषध निर्माणशास्त्रासह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य पातळीवर एमएचटी- सीईटी परीक्षा घेतली जाते. राज्य सामाईक परीक्षा ...

Before the CET application deadline, after the 12th result; hit many students | सीईटी अर्जाची मुदत आधी, बारावीचा निकाल नंतर;अनेक विद्यार्थ्यांना फटका

सीईटी अर्जाची मुदत आधी, बारावीचा निकाल नंतर;अनेक विद्यार्थ्यांना फटका

googlenewsNext

अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व औषध निर्माणशास्त्रासह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य पातळीवर एमएचटी- सीईटी परीक्षा घेतली जाते. राज्य सामाईक परीक्षा कक्षाकडून सर्व नियोजन केले जाते. कोरोनाचा संसर्ग न ओसरल्याने परीक्षाबाबत संभ्रम आहे. जेईई-मेन्सच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आणि परीक्षा पुढे ढकलल्या. त्यामुळे हा संभ्रम पुन्हा वाढला. एमएचटी-सीईटीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ जुलै होती. बारावीचा निकाल ४ ऑगस्ट २०२१ रोजी जाहीर झाला. निकालासाठी प्रतीक्षा करणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना अर्जच भरता आला नाही. याचा त्यांच्या शैक्षणिक आयुष्याला मोठा फटका बसला आहे.

बॉक्स

अर्जासाठी मुदतवाढ द्यावी

राज्य सामाईक प्रवेशप्रक्रिया कक्षाकडून ८ जून रोजी एमएचटी-सीईटीचे वेळापत्रक जारी करण्यात आले. या वेळापत्रकानुसार ७ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करायची होती. १५ जुलैपर्यंत विलंब शुल्कासह नोंदणी करणार येणार होती. ७ जुलै रोजी सूचना जारी करण्यात आली व विलंब शुल्काशिवाय १५ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली. तोपर्यंत एमएचटी- सीईटी कधी होणार हे स्पष्ट झाले नव्हते. आता सप्टेंबर महिन्यात दोन टप्प्यांमध्ये हे आयोजन होणार आहे. अशा स्थितीत संधी हुकलेल्यांना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ का दिली नाही, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.

अर्ज करू न शकलेले विद्यार्थी म्हणतात...

एमएचटी-सीईटी आणि बारावीचा निकाल जाहीर करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव होता. निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवस तरी अर्ज भरण्याची संधी द्यायला हवी होती. मात्र असे न झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले.

-विवेक बोदलकर, चंद्रपूर

कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रात गोंधळ सुरू आहे. राज्य शासन विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेतले पाहिजे. केवळ नोकरशाहीवर अवलंबून राहून आदेश काढणे चुकीचे ठरते, हेच यंदाच्या एमएचटी-सीईटी परीक्षेवरून अंदाज येत आहे.

-प्रगती गोहोकर, विठ्ठल मंदिर वॉर्ड, चंद्रपूर

यासाठी घेतली जाते सीईटी

अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाते सीईटी.

Web Title: Before the CET application deadline, after the 12th result; hit many students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.