सीएफपी प्लांटने भिलाईवरून ऑक्सिजनचा पुरवठा करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:29 AM2021-05-09T04:29:00+5:302021-05-09T04:29:00+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना सोयीसुविधा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी फेरो अलॉय प्लांटचे ईडी झोडे ...
चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना सोयीसुविधा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी फेरो अलॉय प्लांटचे ईडी झोडे यांच्याशी बैठक घेऊन भिलाई येथून सीएफपी प्लांटमधून लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करावा, अशी मागणी केली.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. परिणामी ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे भिलाई येथून ऑक्सिजनचा पुरवठा करावा, अशी मागणी केली. यावेळी फेरो अलॅाय प्लांटच्या प्रबंधनाने भिलाई येथून लिक्वीड ऑक्सिजन जिल्ह्यातील रुग्णांसाठी टँकरद्वारे आयात होत असल्याची माहिती दिली. तसेच कंपनीतील नायट्रोजन प्लांटचे ऑक्सिजन प्लांटमध्ये परावर्तित करण्याच्या सूचनाही अहीर यांनी केल्या. तसेच प्लांटमधील ऑक्सिजन सिलिंडर एसडीओकडे सुपूर्द करावेत. भविष्यात ऑक्सिजनची गरज पाहता कंपनी व्यवस्थापन स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या दृष्टीने योजना तयार करत असल्याने अहीर यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी फेरो अलॉय प्लांटचे ईडी झोडे, व्यवस्थापक शर्मा, एसडीएम घुगे, दिनकर सोमलकर आदी उपस्थित होते.