चंद्रपूर महापालिकेवर धडकला यंग चांदा ब्रिगेडचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:55 AM2019-05-30T00:55:43+5:302019-05-30T00:56:13+5:30

चंद्रपूर शहरात मुबलक पाणी पूरवठा करा या मागणीसाठी किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने चंद्रपूर महानगर पालिकेवर जनाक्रोष मोर्चा काढण्यात आला. जैनभवन जवळून लेझीम पथकासह निघालेला हा मोर्चा नारेबाजी करत पालकेवर धडकला. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती.

Chadka Young Chanda Brigade's Front on Chandrapur Municipal Corporation | चंद्रपूर महापालिकेवर धडकला यंग चांदा ब्रिगेडचा मोर्चा

चंद्रपूर महापालिकेवर धडकला यंग चांदा ब्रिगेडचा मोर्चा

Next
ठळक मुद्देमोर्चात गाढव : मोर्चातून प्रकट केला नागरिकांनी रोष

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहरात मुबलक पाणी पूरवठा करा या मागणीसाठी किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने चंद्रपूर महानगर पालिकेवर जनाक्रोष मोर्चा काढण्यात आला. जैनभवन जवळून लेझीम पथकासह निघालेला हा मोर्चा नारेबाजी करत पालकेवर धडकला. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. मोर्चात पाणी द्या या मागणीच्या फलकांसह सहभागी झालेल्या गाढवांनी नागरिकांचे लक्ष वेधले.
चंद्रपूर शहर देशात नव्हे तर जगात उष्णतेच्या बाबतीत अव्वल आहे. अशातच महानगरपालिका कंत्राटदासोबत आर्थिक समीकरण जुळवण्यासाठी चंद्रपूकरांवर मानव निर्मित पाणी संकट लादत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. रखरखत्या उन्हात चटके सोसत नागरिकांना पाण्यासाठी पायपीठ करावी लागत आहे. त्यामूळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात संताप आहे.
या विरोधात यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उचलण्यात आलो. असे असले तरी, शहरातील पाणी समस्या अद्यापही सुटलेली नाही. विशेष म्हणजे, इरई धरणात मुलबल पाणीसाठा उपलब्ध आहे. असे असताना शहरात पाणी टंचाई आहे. चंद्रपूरातील अणेक भागात पाच दिवसाआड पाणी पूरवठा केल्या जात आहे. ही बाब लक्षात घेऊन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने टॅकरद्वारे पाणी पूरवठा केल्या जात आहे. मात्र पालिका प्रशासन नागरिकांच्या पाणी पुरवठ्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामूळे नागरिकांचा रोष लक्षात घेता आज यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात आक्रोष मोर्चा काढण्यात आला. जैन भवणजवळून निघालेला हा मोर्चा शहरातील जयंत टॉकीज चौकातून वळण घेत थेट महानगर पालिकेवर धडकला. पालिकेत पोहचताच मोचार्चे रुपांत्तर सभेत झाले. महापालिकेचे अधिकारी माणसांचे ऐकत नाही. त्यामुळे त्यांच्या नातलगांना सोबत घेवून आलो आहो, असे असे मत यावेळी जोरगेवार यांनी व्यक्त केले. मोर्चात नगरसेवक विशाल निंबाळकर, वंदना हातगावकर, दुर्गा वैरागडे, संतोषी चव्हाण, रुपा परसराम, नंदा पंधरे, कविता शुक्ला आदींनी सहभाग घेतला.
 

Web Title: Chadka Young Chanda Brigade's Front on Chandrapur Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Morchaमोर्चा